मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. प्रत्येक सामना महत्त्वाचा असून प्लेऑफचं गणित लवकरच स्पष्ट होणार आहे. या स्पर्धेतील 53 वा सामना आज (7 मे) कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होत आहे. मागच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने सनराईजर्स हैदराबादला पराभवाचं पाणी पाजलं होतं. दुसरीकडे, पंजाब किंग्सला मुंबईने पराभूत केलं होतं. त्यामुळे गुणतालिकेतलं गणित पाहता दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. या सामन्यापूर्वी आम्ही तुम्हाला ड्रीम 11 साठी काही मदत करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला टीम बनवणं सोपं होईल आणि कोट्यवधींचं बक्षीस जिंकता येईल.
कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्स ही लढत ईडन गार्डन्स मैदानावर होणार आहे. हे मैदान वेगवान गोलंदाजांसाठी पूरक आहे. पण मागच्या सामन्यात इथे धावांचा वर्षाव झाला होता. त्यामुळे या मैदानात मोठी धावसंख्या होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत या मैदानात विजयी लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला यश मिळताना दिसत आहे. अशात नाणेफेकीचा कौल जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला जाईल.
कोलकाता नाइट रायडर्स : एन जगदीसन, रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), वेंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकुर, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती
पंजाब किंग्स : शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा (विकेटकीपर), सिकंदर राजा, शाहरुख खान, सॅम करन, ऋषि धवन, हरप्रीत बराड, राहुल चाहर, अर्शदीप सिंह
कोलकात्याचा पूर्ण स्क्वॉड : नीतीश राणा, रिंकू सिंह, रहमनुल्लाह गुरबाज, डेविड वीजा, कुलवंत खेजरोलिया, सुयश शर्मा, अनुकूल रॉय, लॉकी फर्गयूसन, आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, उमेश यादव, हर्षित राणा, टिम साउदी, शार्दुल ठाकुर, सुनील नरेन, वैभव अरोड़ा, वरुण चक्रवर्ती, नारायण जगदीशन, लिट्टन दास, मनदीप सिंह आणि शाकिब अल हसन.
पंजाबचा पूर्ण स्क्वॉड : शिखर धवन, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, प्रभसिमरन सिंह, अथर्व तायडे, हरप्रीत बरार, लियम लिविंगस्टन, राज अंगद बावा, मॅथ्यू शॉर्ट, ऋषि धवन, शाहरुख खान, अर्शदीप सिंह, बलतेज सिंह, कागिसो रबाडा, नाथन एलिस, राहुल चाहर, सैम कर्रन, सिकंदर रजा, हरप्रीत भाटिया, विद्धवत, मोहित राठी, शिवम सिंह.
(Disclaimer : ड्रीम 11 वर टीम बनवणं आणि खेळणं आर्थिकरित्या जोखमीचं आहे. तुम्हाला याची सवय लागू शकते. यात आर्थिक फटका बसू शकतो त्यामुळे जबाबदारीने निर्णय घ्या. आम्ही या खेळाला प्रोत्साहन देत नाही. ही बातमी देण्यामागचा हेतू फक्त माहिती पोहोचवणे आणि अपडेट ठेवणं इतकाच आहे.)