आयपीएलच्या 14 व्या पर्वातील 45 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स या संघामध्ये दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवला गेला. सामन्यात पंजाबने 6 गडी राखून विजय मिळवला आहे. सामन्यात नाणेफेक जिंकत पंजाब संघाने गोलंदाजीचा निर्णय़ घेतला. ज्यानंतर आता केकेआरचे खेळाडू फलंदाजीला आले. ज्यानंतर सलामीवीर व्यंकटेश अय्यरने तुफानी अर्धशतक झळकावलं. त्याच्या 67 धावांसह राहुल त्रिपाठीच्या 34 आणि नितीश राणाच्या 31 धावांच्या जोरावर केकआरने 165 धावांपर्यंत मजल मारली आहे. त्यानंतर 166 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या पंजाबकडून कर्णधार केएल राहुलने आणि मयांकने उत्तम सुरुवात करुन दिली. मयांक 40 धावावंर बाद झाल्यानंतर राहुलने मात्र एकहाती खिंड लढवली. राहुल अखेरच्या षटकात 67 धावांवर बाद झाल्यानंतर शाहरुख खानने एक षटकार खेचत सामना पंजाबला 6 विकेट्सनी जिंकून दिला.
166 धावांची गरज पंजाबला विजयासाठी असताना सामना अखेरच्या षटकापर्यंत गेला. शेवटच्या षटकात राहुल बाद झाल्यानंतर झाल्यानंतर 4 चेंडूत 4 धावांची गरज असताना युवा फलंदाज शाहरुख खानने षटकार खेचत सामना केकेआरला जिंकवून दिला.
पंजाबने आणखी एक गडी गमावला आहे. शिवम मावीच्या चेंडूवर हुडा बाद झाला आहे. राहुल त्रिपाठीने त्याचा झेल घेतला आहे.
केकेआरचा स्टार खेळाडू सुनील नारायणने मार्करमला बाद केलं आहे. गिलने त्याचा झेल घेतला आहे.
पंजाबचा कर्णधार केएल राहुल पुन्हा एकदा कर्णधारी खेळी करत आहे. नुकतच त्याने अर्धशतक पूर्ण केलं आहे. आता पंजाबला विजयासाठी 30 चेंडूत 45 धावांची गरज आहे.
पंजाबचा सलामीवीर मयांक अगरवालची विकेट घेतल्यानंतर वरुण चक्रवर्तीने पूरनलाही बाद केलं आहे. पंजाबचे दोन गडी तंबूत परतले असून सध्या कर्णधार राहुल मार्करमसोबत फलंदाजी करत आहे.
पंजाब किंग्सला विजयासाठी 166 धावांची गरज आहे. सध्या सलामीवीर केएल राहुल आणि मयांक अगरवाल मैदानात आळे आहेत.
अखेरच्या चेंडूवर अर्शदीपने दिनेश कार्तिकला बोल्ड करत केकेआरचा डाव 165 धावांवर रोखला आहे.
मोहम्मद शमीने 19 व्या षटकात केकेआरच्या टीम सैफर्टला धावचीत केलं आहे. 19 ओव्हरनंतर केकआरचा स्कोर 158 वर 6 बाद झाला आहे.
युवा अर्शदीपने आणखी एक विकेट घेत चांगल्या लयीत असणाऱ्या नितीश राणाला तंबूत धाडलं आहे. मयांकने राणाची कॅच घेतली आहे.
केकेआरचा कर्णधार इयॉन मॉर्गन आजही स्वस्तात माघारी परतला आहे. केवळ दोन धावांवर मोहम्मद शमीने त्याला पायचीत केलं आहे.
केकेआरकडून तुफान खेळी करणारा व्यंकटेश अय्यरही बाद झाला आहे. रवी बिश्नोईच्या चेंडूवर दीपक हुडाने त्याचा झेल घेतला आहे.
केकेआरचा दुसरा गडी राहुल त्रिपाठीच्या रुपात बाद झाला आहे. रवी बिश्नोईने त्याची विकेट घेतली आहे. तर दुसरीकडे सलामीवीर व्यंकटेशने त्याचं अर्धशतक पूर्ण केलं आहे.
केकेरआचा सलामीवीर शुभमन गिल पंजाबचा युवा खेळाडू अर्शदीप सिंगच्या चेंडूवर बाद झाला आहे. गिल 7 धावा करुन बाद झाला आहे.
इयॉन मॉर्गन (कर्णधार), शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, दिनेश कार्तिक, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, टीम सॅफर्ट, सुनील नारायण, शिवम मावी, टीम साऊदी, वरुण चक्रवर्ती.
केएल राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), मयांक अगरवाल, निकोलस पुरन, एडन मार्करम, दीपक हुडा, शाहरुख खान, फॅबियन अॅलिन, नथॅन एलिस, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग.
नाणेफेक जिंकत पंजाब किंग्सचा कर्णधार केएल राहुलने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. त्यामुळे केकेआर प्रथम फलंदाजीला येणार आहे.
प्लेऑफमध्ये एन्ट्रीसाठी हा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा असताना पंजाब संघाला सामन्यापूर्वीच एक मोठा झटका बसला आहे. त्यांचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल याने संपूर्ण आय़पीएल स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. बायोबबलमधून स्वत:ला विश्रांती देण्यासाठी तसेच आगामी टी20 विश्व चषकात वेस्टइंडीज संघाकडून चांगली कामगिरी करण्याकरता स्वत:ला वेळ देत असल्याचे कारण गेलने दिले आहे.