इंडियन प्रिमीयर लीगच्या 14 व्या पर्वातील 49 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनराजर्स हैद्राबाद या संघामध्ये खेळवला गेला. सामन्यात नाणेफेक जिंकत हैद्राबाद संघाने प्रथम फलंदाजी निवडली. पण हैद्राबादसाठी हा निर्णय़ चूकीचा ठरला. संघातील एकाही फलंदाजाला टिकून खेळता आले नाही. ज्यामुळे संघ केवळ 115 धावाच करु शकला. संपूर्ण संघात सर्वाधिक धावा विल्यमसन (26), गार्ग (21) आणि अब्दुल समाद (25) यांनी केल्या. याखेरीज इतरांना 10 हून अधिक धावा करता आल्या नाहीत. सध्या केकेआरचे फलंदाज 116 धावांचे सोपे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मैदानात आले. केकेआरकडून सलामीवीर शुभमनने दमदार अर्धशतक (57) ठोकलं. तर राणाने 25 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. अखेर कार्तिकने 18 महत्त्वपूर्ण धावा करत सामना केकेआऱला 6 विकेट्नसनी जिंकवून दिला.
116 धावांचे सोपे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मैदानात आले. केकेआरकडून सलामीवीर शुभमनने दमदार अर्धशतक (57) ठोकलं. तर राणाने 25 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. अखेर कार्तिकने 18 महत्त्वपूर्ण धावा करत सामना केकेआऱला 6 विकेट्नसनी जिंकवून दिला.
होल्डर आणि सिद्धार्थ कौल यांनी राणा आणि गिलला बाद केलं असलं तरी सामना केकेआरच्या दिशेने होत आहे.
केकेआरचा डाव सांभाळण्यासाठी नितीश राणा आणि शुभमन गिल हे दोघे टिकून खेळत आहेत.
मागील काही सामने दमदार कामगिरी केलेले केकेआरचे युवा फलंदाज अय्यर आणि राहुल त्रिपाठी दोघेबी एका पाठोपाठ बाद झाले आहेत. त्रिपाठीची विकेट राशिद खानने घेतली आहे.
मागील काही सामने तुफान फलंदाजी करणारा व्यंकटेश अय्यर आज स्वस्तात माघारी परतला आहे. 8 धावांवर खेळत असताना जेसन होल्डरने त्याची विकेट मिळवली आहे.
केकेआरचे सलामीवीर शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यर मैदानात उतरले आहेत.
हैद्राबादचे सर्व फलंदाज आज फेल झाल्याने संघ केवळ 115 धावाच करु शकला आहे. त्यामुळे केकेआरसमोर 116 धावांचे सोपे आव्हान आहे.
हैद्राबादचा राशिद खानही बाद झाला आहे. शिवम मावीच्या चेंडूवर व्यंकटेश अय्यरने त्याची कॅच घेतली आहे.
हैद्राबादचा अब्दुल समादही बाद झाला आहे. अवघ्या 100 धावांच्या आतच सातवा गडी तंबूत परतला आहे.
हैद्राबादची सहावा गडी जेसन होल्डरच्या रुपात बाद झाला आहे.चक्रवर्तीनेच त्याचाही विकेट घेतला आहे.
हैद्राबादचा डाव सांभाळत असलेला युवा फलंदाज प्रियम गार्गही 21 धावा करुन बाद झाला आहे. चक्रवर्तीच्या चेंडूवर राहुलने त्याचा झेल घेतला आहे.
हैद्राबाद संघाचा चौथा गडीही तंबूत परतला आहे. अभिषेक शर्माही 6 धावा करुन बाद झाला आहे.
हैद्राबाद संघाचे फलंदाज बाद होत असताना त्यांच्यासाठी मोठी आशा असणारा केन विल्यमसनही बाद झाला आहे. शाकिब अल हसनने त्याला धावचीत केलं आहे.
हैद्राबाद संघाचा दुसरा सलीमीवीरही बाद झाला आहे. शिवम मावीच्या चेंडूवर साऊदीने जेसन रॉयची कॅच घेत त्याला तंबूत धाडलं आहे.
सनरायजर्स हैद्राबाद संघाला दुसऱ्याच चेंडूवर मोठा झटका बसला आहे. त्यांचा सलामीवीर रिद्धिमान साहा याला केकेआरच्या साऊदीने क्लिन बोल्ड केलं आहे.
जेसन रॉय , रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), प्रियम गार्ग, केन विल्यमसन (कर्णधार), अभिषेक शर्मा, अब्दुल समाद, जेसन होल्डर, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, उमान मलिक, सिद्धार्थ कौल
इयॉन मॉर्गन (कर्णधार), शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, दिनेश कार्तिक, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, शाकिब अल हसन, सुनील नारायण, टीम साऊदी, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती.
नाणेफेक जिंकत केन विल्यमसनने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. त्यामुळे हैद्राबादचे फलंदाज थोड्याच वेळात मैदानात उतरतील.