मुंबई: आंद्रे रसेलला (Andre Russell) क्रिकेट जगतातील सर्वात धोकादायक फलंदाज का म्हणतात? ते त्याने आज दाखवून दिलं. कुठल्याही षटकात सामना फिरवण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. पॉवर हिंटिंग लांब. लांब पर्यंत चेंडू पोहोचवण्याची ताकत त्याच्या फलंदाजीत आहे. आंद्रे रसेलने आज आपल्याच त्याच कौशल्याची चुणूक दाखवली. एका अवघड परिस्थितीत आंद्रे रसेल फलंदाजीसाठी मैदानात आला होता. पंजाब किंग्सने (kxip) दिलेल्या 138 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चार बाद 51 अशी कोलकाताची अवस्था झाली होती. कोलकाताचा संघ (kkr) अडचणीत होता. हा सामना सुद्धा कोलकाता गमावणार का? असं अनेकांना वाटलं होतं. पण आंद्रे रसेलने सगळ चित्रच बदलून टाकलं. त्याने सामना लवकर संपवलाच. पण पंजाबच्या गोलंदाजांची दिशा आणि टप्पाही बिघडवला.
आंद्रे रसेल फलंदाजी करत असताना त्याला रोखायचं कसं? हाच प्रश्न पंजाबच्या गोलंदाजांना पडला. मैदानावर आल्यानंतर त्याने लांबच लांब षटकार मारायला सुरुवात केली. रसेलने त्याची कॅरेबियन पॉवर दाखवून दिली. ओडिन स्मिथच्या गोलंदाजीचा तर कचरा केला. त्याच्या एका ओव्हरमध्ये 29 रन्स वसूल केल्या. यात सलग तीन चेंडूवर ठोकलेले तीन षटकार होते. आंद्रे रसेलने 31 चेंडूत नाबाद 70 धावा केल्या. यात दोन चौकार आणि आठ षटकार होते. कोलकाता नाइट रायडर्सने मेगा ऑक्शनआधी 90 कोटी पैकी 42 कोटी चार खेळाडूंना रिटेन करण्यासाठी वापरले होते. यात आंद्रे रसेलसाठी 12 कोटी मोजले होते.
He’s not in the stands..but this is what our boss @iamsrk’s reaction is after this amazing victory tonight ???
Superb bowling tonight by @KKRiders and then chased this comfortably ????
Well player Knights??#KKRHaiTaiyaar pic.twitter.com/ak7u34vcAk
— ♡♔SRKCFC♔♡™ (@SRKCHENNAIFC) April 1, 2022
कोलकाताने रसेलसाठी इतके पैसे का मोजले? ते आज समजलं. सामन्याआधी आंद्र रसेलच्या फिटनेसबद्दल प्रश्नचिन्ह होतं. तो आज खेळणार की, नाही या बद्दल साशंकता होती. पण तो आजच्या सामन्यात खेळला. आपल्या फलंदाजीने त्याने सर्वांनाच जिंकून घेतलं. रसेलच्या या आक्रमक फलंदाजीनंतर सोशल मीडियावर अनेक गमतीशीर मीम्स व्हायरल झाल्या आहेत.
How bowlers should bowl to Russ:#KKRHaiTaiyaar #KKRvPBKS #IPL2022 pic.twitter.com/aX7rsZcByx
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 1, 2022
“मला खूपच छान वाटतय. मी ज्या क्रमांकावर फलंदाजी करत होतो, तिथे मी काय करु शकतो, याची मला कल्पना होती. सॅमसारख फलंदाज क्रीझवर होता, ही चांगली बाब आहे. मला माझी क्षमता ठाऊक होती. संघासाठी जे गरजेच होतं, ते मी केलं, याचा मला आनंद आहे” असं रसेल सामना संपवल्यानंतर म्हणाला.