मुंबई: राजस्थान रॉयल्सने आज प्रथम फलंदाजी करताना पाच बाद 152 धावा केल्या. कोलकाताला विजयासाठी (KKR vs RR) 153 धावांचे टार्गेट आहे. आयपीएलमधला आजचा 47 वा सामना आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ही मॅच सुरु आहे. केकेआरने चांगली गोलंदाजी केली. त्यांनी राजस्थान सारख्या बलाढ्य संघाला 153 धावांवर रोखलं. शिमरॉन हेटमायरने अखेरीस केलेल्या फटकेबाजीमुळे राजस्थानला 150 धावांचा टप्पा ओलांडता आला. राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) डाव अडचणीत असताना आज संजू सॅमसनने (Sanju Samson) कॅप्टन इनिंग्सचा खेळ दाखवला. संजूने आज संघाच्या गरजेनुसार खेळ केला. त्याने 49 चेंडूत 54 धावा केल्या. यात 7 चौकार आणि 1 षटकार होते. संजू खरंतर खूप वेगवान खेळतो. पण कोलकाताच्या गोलंदाजांनीही आज चांगला मारा करत थोडं जखडून ठेवलं होतं. शिवम मावीच्या गोलंदाजीवर सिंहने त्याचा सीमारेषेवर झेल घेतला.
संजू सॅमसनचे चौकार-षटकार पाहण्यासाठी इथे क्लिक करा
देवदत्त पडिक्कल आज स्वस्तात बाद झाला. त्यामुळे संजू सॅमसन लवकर फलंदाजीला आला. देवदत्त अवघ्या 2 रन्सवर आऊट झाला. उमेश यादवने आपल्याच गोलंदाजीवर त्याचा एकाहाताने अप्रतिम झेल घेतला. मागच्या सामन्यात पण उमेश यादवने आपल्याच गोलंदाजीवर दिल्ली कॅपिटल्सच्या पृथ्वी शॉ चा जमिनीच्या दिशेने जाणारा अप्रतिम झेल घेतला होता.
उमेशने एका हाताने घेतलेला झेल पहाण्यासाठी इथे क्लिक करा
व्हॉट ए कॅच, क्लिक करुन बटलरची ही कॅच पहाच
जोस बटलर आज नेहमीसारखा फॉर्ममध्ये दिसला नाही. तो लवकर बाद झाला. कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. त्यामुळे जोस बटलरला मोकळेपणाने फटकेबाजी करता आली नाही. स्पर्धेत सर्वाधिक धावा जोस बटलरच्या नावावर आहेत. ऑरेंज कॅप त्याच्याकडे आहे. आज जोस बटलर फक्त 22 धावांवर बाद झाला. त्याने 25 चेंडू खेळले. टिम साउदीच्या गोलंदाजीवर शिवम मावीने अप्रतिम झेल घेतला.