मुंबई: IPL 2022 मध्ये आज कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये (KKR vs RR) सामना होत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडिमयवर (Wankhede stadium) ही मॅच होतेय. आयपीएलमधला आजचा 47 वा सामना आहे. प्लेऑफच्या (Playoff) आशा जिवंत ठेवण्यासाठी केकेआरला आजचा सामना काहीही करुन जिंकणं आवश्यक आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या केकेआरचा सलग पाच सामन्यात पराभव झाला आहे. हा संघ आठव्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्सच्या कामगिरीत सातत्य आहे. पण मागच्या सामन्यात त्यांचा मुंबई इंडियन्सने पराभव केला होता. संजू सॅमसनचा संघ प्लेऑफच्या दिशेने मजबुतीने पाऊल टाकतोय. हाच संघ आजच्या विजयाचा दावेदार आहे.
Waiting for something cool because it’s time for @anukul06roy in ?&? #KKRHaiTaiyaar #KKRvRR #IPL2022 pic.twitter.com/nRiJqJ0Vx5
— KolkataKnightRiders (@KKRiders) May 2, 2022
कोलकाता नाइट रायडर्सने टॉस जिंकला असून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मागच्या काही सामन्यांप्रमाणे केकेआरने आजही संघात बदल केले आहेत. वेंकटेश अय्यर आणि हर्षित राणाला वगळलं आहे. राजस्थानने टीममध्ये एक बदल केला असून करुण नायरला संघात संधी दिली आहे. वेंकटेश आणि हर्षितच्या जागी शिवम मावी, अनुकूल रॉयला संधी दिली आहे. अनुकूल केकेआरकडून आयपीएलमध्ये डेब्यु करतोय.
KKR ची प्लेइंग – 11
श्रेयस अय्यर (कॅप्टन), एरॉन फिंच, नीतीश राणा, बाबा इंद्रजीत, आंद्रे रसेल, सुनील नरेन, अनुकूल रॉय, रिंकू सिंह, शिवम मावी, उमेश यादव, टिम साउदी,
राजस्थान रॉयल्सची प्लेइंग – 11
संजू सॅमसन (कॅप्टन), जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, करुण नायर, आर.अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल, कुलदीप सेन,