आयपीएल 2021 मधील 54 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात शारजाहच्या मैदानावर पार पडला. प्लेऑफमध्ये चौथा संघ कोणता असेल? या प्रश्नाच्या उत्तरासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. त्यात कोलकात्याने सामना मोठ्या फरकाने जिंकत प्लेऑफच्या दिशेने मोठं पाऊल टाकलं आहे. सामन्यात नाणेफेक जिंकत राजस्थान रॉयल्सने गोलंदाजी निवडली. ज्यानंतर फलंदाजीला आलेल्या केकेआरने सलामीवीर शुभमनच्या अर्धशतकासह (56), अय्यर (38) आणि त्रिपाठीच्या (21) धावांच्या जोरावर 171 धावांपर्यंत मजल मारली. ज्यानंतर राजस्थानचे सर्व फलंदाज अपयशी ठरले. केवळ राहुल तेवतियाने (44) धावा केल्या पण त्याला साथ न मिळाल्याने अखेर केकेआर 86 धावांनी विजयी झाली.
एकाबाजून राजस्थानचा डाव सांभाळणारा राहुल तेवतियाही बाद झाल्यानंतर राजस्थान पराभूत झाली आहे. 86 धावांनी केकेआर विजयी झाली आहे.
लॉकी फर्ग्यूसनने तिसरा विकेट घेतला असून उनाडकट बाद झाला आहे. शाकिब अल हसनने त्याचा झेल घेतला आहे.
ख्रिस मॉरीसच्या रुपात राजस्थानचा सातवा गडी बाद झाला आहे. वरुणने त्याची विकेट घेतली आहे.
केकेआरचा गोलंदाज शिवम मावीने एकाच षटकात ग्लेन फिलिप्स आणि शिवम दुबे असे राजस्थानचे दोन गडी तंबूत धाडले आहेत.
केकेआरचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्यूसनने राजस्थानला दोन झटके दिले आहेत. लियाम आणि अनुज यांची विकेट लॉकीने घेतली आहे.
राजस्थान संघाच्या फलंदाजीला सुरुवात होताच त्यांचे गडी बाद होण्यास सुरुवात झाली आहे. सर्वात आधी शाकिबने यशस्वीला शून्यावर बाद केले. त्यानंतर शिवम मावीने कर्णधार संजू सॅमसनला बाद केले आहे.
राहुल त्रिपाठी बाद केकेआरने सलामीवीर शुभमनच्या अर्धशतकासह (56), अय्यर (38) आणि त्रिपाठीच्या (21) धावांच्या जोरावर केकेआरने 171 धावांपर्यंत मजल मारली आहे.
केकेआरचा अजून एक फलंदाज तंबूत परतला आहे. 21 धावा करुन राहुल त्रिपाठी बाद झाला असून चेतन सकारियाने त्याची विकेट घेतली आहे.
अर्धशतक होताच शुभमन गिल बाद झाला आहे. 56 धावांवर असताना ख्रिस मॉरीसच्या चेंडूवर यशस्वीने त्याची कॅच घेतली आहे.
केकेआरचा सलामीवीर शुभमन गिलने पुन्हा एकदा दमदार खेळीचे प्रदर्शन घडवत अर्धशतक ठोकले आहे. सध्या त्याने राहुल त्रिपाठीसोबत केकेआरची कमान सांभाळली आहे.
केकेआरचा दुसरा गडी नितीश राणाही बाद झाला आहे. ग्लेन फिलिप्सने त्याला बाद केलं आहे.
तुफान फलंदाजीने सुरुवात करणारा केकेआरचा सलामीवीर व्यंकटेश अय्यर 38 धावा करुन बाद झाला आहे. राहुल तेवतियाने त्याची विकेट घेतली आहे.
केकेआरच्या सलामीवीरांनी उत्तम सुरुवात करत 50 धावांचा टप्पा एकही विकेट न गमावता पार केला आहे. 8 षटकानंतर केकेआरचा स्कोर 50 आहे.
केकेआरचे सलामीवीर शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यर फलंदाजीसाठी मैदानात आले आहेत.
सामन्यात नाणेफेक जिंकत राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने गोलंदाजी निवडली आहे.
इयॉन मॉर्गन (कर्णधार), शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, दिनेश कार्तिक, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, शाकिब अल हसन, सुनील नारायण, लॉकी फर्ग्यूसन, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती.
संजू सॅमसन(कर्णधार आणि यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल, ग्लेन फिलिप्स, लियाम लिव्हिंगस्टोन, शिवम दुबे, अनुज रावत, ख्रिस मॉरीस, राहुल तेवतिया, जयदेव उनाडकट, मुस्तफिजूर रेहमान, चेतन सकारीया