Virat-Anushka not attended KL Rahul-Athiya Wedding: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू केएल राहुल काल बॉलिवूड अभिनेत्री आथिया शेट्टीसोबत विवाहबद्ध झाला. खंडाळा येथील सुनील शेट्टीच्या फार्म हाऊसवर हे लग्न पार पडलं. केएल राहुल आणि आथिया आता पती-पत्नी झाले आहेत. या लग्नासाठी काही व्हीआयपी पाहुणे आले होते. काही पाहुण्यांच्या नावाची चर्चा होती. पणे ते येऊ शकले नाहीत. विराट कोहली केएल राहुलचा जवळचा मित्र आहे. त्यामुळे तो लग्नाला येईल असं सर्वांना वाटलं होतं. पण सध्या न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरीज सुरु आहे. त्यामुळे विराट या लग्नाला येण शक्य नव्हतं. पण अनुष्का शर्मा निदान येईल, अशी शक्यता होती. पण अनुष्का सुद्धा आली नाही.
दोघांमध्ये चांगली मैत्री
रोहित शर्मा, हार्दिक पंड्यासह स्टार खेळाडू या लग्नाला येऊ शकले नाहीत. कारण आज न्यूझीलंड विरुद्ध तिसरा वनडे सामना आहे. केएल राहुल आणि विराट कोहली दोघे टॉप ऑर्डरमध्ये खेळतात. तिन्ही फॉर्मेटमध्ये दोघेही खेळतात. त्यांच्यात चांगली मैत्री आहे. आथिया आणि अनुष्कामध्ये सुद्धा चांगलं नात आहे. अनेकदा दोघी एकत्र दिसल्या आहेत. मात्र तरीही या लग्नामध्ये अनुष्का दिसली नाही.
म्हणून अनुष्का गेली नाही
DNA च्या वृत्तानुसार, विराट कोहलीप्रमाणे अनुष्का शर्मा सुद्धा तिच्या कामामुळे राहुल-आथियाच्या लग्नाला हजर राहू शकली नाही. सोमवारी अनुष्का मुंबईत स्लर्प फार्मच्या एका कार्यक्रमाला उपस्थित होती. या कंपनीत अनुष्काने गुंतवणूक केलीय. राहुल आणि आथियाच्या लग्नाच रिसेप्शन मे महिन्यात होणार आहे. आयपीएलनंतर रिसेप्शन होईल, असं सुनील शेट्टीने सांगितलं. त्यावेळी टीम इंडिया आणि बॉलिवूडचे कलाकार उपस्थित राहतील.
राहुलच्या लग्नाला ‘हा’ भारतीय क्रिकेटर उपस्थित
राहुल आणि आथियाच्या लग्नाला भारतीय क्रिकेटपटू इशांत शर्मा उपस्थित होता. त्याशिवाय बॉलिवूड विश्वातील काही नावाजलेली स्टार मंडळी पोहोचली होती. सुनील शेट्टीचा मित्र अजय देवगण, संजय दत्त सुद्धा लग्नाला आले होते. संजय दत्तने टि्वटरवर पोस्ट करुन दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.
राहुलच्या आईची एंट्री बनली चर्चेचा विषय
या लग्नात केएल राहुलची आई राजेश्वरी यांची खंडाळ्यातील फार्म हाऊसवरील एंट्री चर्चेचा विषय बनली आहे. सोशल मीडियावर या एंट्रीची जोरदार चर्चा आहे. कारण राजेश्वरी या ज्या कारमधून आल्या, ती साधीसुधी कार नाहीय.