IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना इंग्लंडमधील ओव्हलच्या मैदानात सुरु आहे. दरम्यान या सामन्यात भारतीय फलंदाजानी दुसऱ्या डावात केलेल्या कामगिरीचं कौतुक होत असून सलामीवीरांनी केलेल्या संयमी फलंदाजीमुळे भारत सामन्यात मजबूत स्थितीत आहे. पण भारताचा सलामीवीर केएल राहुल (KL Rahul) याला मात्र आयसीसीच्या (ICC) कारवाईला सामोरं जावं लागलं आहे. बाद झाल्यानंतर पंचाच्या निर्णयावर असहमती दर्शवत चूकीची वागणूक केल्याबद्दल राहुलवर कारवाई करण्यात आली आहे.
चौथ्या कसोटीतील दुसऱ्या डावात भारताचे सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल यांनी उत्तम सुरुवात करुन दिली. पण राहुल 46 धावांवर असताना त्याला अर्धशतकासाठी अवघ्या चार धावांची गरज होती. त्याचवेळी जेम्स अँडरसनच्या चेंडूवर राहुलच्या बॅटला बॉल लागून यष्टीरक्षकाच्या हातात गेला. त्यावेळी प्रथम नाबाद दिल्यानंतर इंग्लंडने रिह्यूय घेताच पंचाकडून बाद देण्यात आलं. त्यावेळी पंचाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत राहुलने असहमती दर्शवली होती. त्यामुळे आय़सीसीच्या नियमांनुसार त्याच्यावर कारवाई करण्यात आली असून त्याची 15 टक्के मॅच फी कापण्यात येणार आहे.
Indian opener KL Rahul has been fined for breaching the ICC Code of Conduct during the fourth #ENGvIND Test at The Oval.
More details ?https://t.co/HdfgWfkIHQ
— ICC (@ICC) September 5, 2021
YESSS @jimmy9 gets the first wicket!
Scorecard/Clips: https://t.co/Kh5KyTSOMS
??????? #ENGvIND ?? pic.twitter.com/oty3Zlu2CG
— England Cricket (@englandcricket) September 4, 2021
इंग्लंडचा कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताचा पहिला डाव अवघ्या 191 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 290 धावांपर्यंत मजल मारत 99 धावांची आघाडी मिळवली होती. मात्र पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या डावात चांगलीच मुसंडी मारली आहे. कर्णधार रोहित शर्माच्या (127) शतकी आणि चेतेश्वर पुजाराच्या (61) अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने तिसऱ्या दिवसअखेर 3 बाद 270 धावांपर्यंत मजल मारली आहे. अंधुक प्रकाशामुळे आजच्या दिवसाचा उर्वरित 40 मिनिटांचा खेळ रद्द करण्याचा निर्णय पंचांनी घेतला आहे. तत्पूर्वी भारताने 270 धावांपर्यंत मजल मारल्यामुळे भारताला 171 धावांची आघाडी घेतली आहे.
इतर बातम्या
IND vs ENG : रोहितचं धडाकेबाज शतक, पुजाराचं अर्धशतक, भारताची इंग्लंडवर 171 धावांची आघाडी
(KL Rahul fined for showing dissent towards Umpire at The Oval test third day)