मुंबई: आशिया कपच्या पहिल्या दोन सामन्यात उपकर्णधार केएल राहुल फ्लॉप ठरला होता. पण आज त्याच्या फलंदाजीची चर्चा आहे. पाकिस्तान विरुद्ध पहिल्या सामन्यात केएल राहुल भोपळा न फोडताच तंबूत परतला होता. दुसऱ्या सामन्यात त्याने टी 20 ला साजेशी फलंदाजी केली नव्हती. राहुलने हाँगकाँग विरुद्ध 39 चेंडूत 36 धावा केल्या होत्या. त्याच्या फलंदाजीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.
राहुलला संघाबाहेर करण्याची मागणी सुरु झाली होती. पण पाकिस्तान विरुद्ध त्याला पुन्हा संधी मिळाली. त्याने सुद्धा आज चांगली फलंदाजी केली. राहुलने 20 चेंडूत 28 धावा केल्या. यात एक चौकार आणि दोन षटकार होते. राहुलने आज चांगली फलंदाजी केली. त्याने एक हॅलिकॉप्टर शॉटही दाखवला.
#INDvsPAK2022 super @klrahul #viral #ViratKohli #indopak pic.twitter.com/lDLirMhZ1S
— Simmi (@simmi_sam2000) September 4, 2022
आज आशिया कप मध्ये भारत-पाकिस्तानचा दुसरा सामना होत आहे. मागच्या रविवारी सामना झाला. त्याच मॅच मध्ये भारताने पाकिस्तानवर पाच विकेट राखून विजय मिळवला होता. चाहते राहुलच्या जागी दीपक हुड्डाचा समावेश करण्याची मागणी करत होते. त्यामुळे आजचा सामना त्याच्यासाठी महत्त्वाचा होता. रोहित-राहुल जोडीने सुरुवातही तशीच दमदार दिली. राहुलने आज त्याच्या खेळीने टीकाकारांची तोंड बंद केली.