मुंबई: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी वनडे सीरीजसाठी नेतृत्वाची धुरा कसोटी उपकर्णधार के.एल.राहुलकडे (KL Rahul) सोपवण्यात आली आहे. काल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरीजसाठी संघ जाहीर करण्यात आला. नियमित कर्णधार रोहित शर्मा अजूनही दुखापतीमधून सावरलेला नाही. त्यामुळे केएल राहुलकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. “भारतीय क्रिकेटचं भविष्य लक्षात घेऊन, केएल राहुलला कॅप्टन म्हणून कसा तयार होईल, त्याला अधिक कसं विकसित करता येईल, याकडे निवड समितीचं लक्ष आहे” असे सिनियर निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) म्हणाले. (KL Rahul is being groomed for India captaincy role says chief selector Chetan Sharma)
विराटला संघात स्थान पण पुन्हा जबाबदारी नाही
मागच्या महिन्यात रोहित शर्माची वनडे आणि टी-20 संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली. भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी मुंबईत सराव करताना रोहित शर्माला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. वनडे सीरीजआधी दुखापतीवर मात करण्यासाठी रोहित बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतही गेला होता. पण अजूनही तो दुखापतीमधून पूर्णपणे सावरलेला नाही. तीन वनडे सामन्यांची मालिका 19 जानेवारीपासून सुरु होणार आहे. निवड समितीने राहुलला कॅप्टन तर जसप्रीत बुमराहला उपकर्णधार बनवले आहे. वनडेच्या कर्णधारपदावरुन हटवण्यात आलेल्या विराट कोहलीला वनडे संघात स्थान देण्यात आले आहे.
त्याने नेतृत्वक्षमता सिद्ध केलीय
“केएल राहुलने त्याची नेतृत्वक्षमता सिद्ध केली आहे आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी त्याची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात यावी, असे निवड समितीमधील सर्व सदस्यांचे मत होते” असे चेतन शर्मा काल संघनिवड जाहीर झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
तो सर्व फॉर्मेटमधला खेळाडू
“सध्याच्या घडीला आम्ही केएल राहुलकडे कर्णधार म्हणून पाहतोय. तो सर्व फॉर्मेटमधला खेळाडू आहे. त्याला कर्णधारपद भूषवण्याचा चांगला अनुभव आहे. त्याने त्याची नेतृत्वक्षमता सिद्ध केली आहे, असं सर्व निवड समिती सदस्यांच मत आहे. रोहित फिट नसल्यामुळे केएल नेतृत्व करण्यासाठी उत्तम राहिलं असा आम्ही विचार केला. त्यामुळे आम्ही त्याच्यावर विश्वास दाखवला आहे. आम्ही संघाला तयार करत आहोत” असे चेतन शर्मा म्हणाले. सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका सुरु आहे. विराटच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
संबंधित बातम्या:
3 महिन्यात 4 कॅप्टन बदलले, तरीही टीम इंडियाचा विजयरथ सुस्साट
IND vs SA: सेंच्युरियन कसोटी जिंकूनही भारतासाठी एक वाईट बातमी
Irfan Pathan: 10 वर्षाने लहान असलेल्या पत्नीसोबत इरफान पठाने शेअर केला रोमँटिक फोटो, कॅप्शनमध्ये लिहिलं…..
(KL Rahul is being groomed for India captaincy role says chief selector Chetan Sharma)