Rishabh Pant Replacement: टीम इंडिया नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच वनडे वर्ल्ड कप 2023 चा तयारी सुरु करणार आहे. वर्ल्ड कप एक मोठी टुर्नामेंट आहे. या टुर्नामेंटच्या निमित्ताने चाहत्यांच्या मनात काही प्रश्न आहेत. सध्या ऋषभ पंत दुखापतग्रस्त आहे. त्याची जागा कोण घेणार? हा प्रश्न आहे. श्रीलंकेविरुद्ध वनडे सीरीजच्या पूर्वसंध्येला काल पत्रकार परिषद झाली. त्यात रोहितने काही गोष्टी स्पष्ट केल्या. पंतची जागा कोण घेणार? हे त्याच्या उत्तरातून कळलं.
पंतची जागा घेणार हा खेळाडू
टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतच्या कारला 30 डिसेंबर 2022 रोजी भीषण अपघात झाला. त्यात तो गंभीर जखमी झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार ऋषभला मैदानावर परतण्यासाठी कमीत कमी 8 ते 9 महिने लागू शकतात. त्यामुळे येणाऱ्या दिवसात विकेटकीपर फलंदाज म्हणून केएल राहुल भारतीय सिलेक्टर्सची पहिली पसंत असेल.
रोहितने भूमिका स्पष्ट केली
भारतीय सिलेक्टर्सनी श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरीजसाठी विकेटकीपर म्हणून केएल राहुल आणि इशान किशन यांचा टीममध्ये समावेश केलाय. रोहितने पत्रकार परिषद स्पष्ट केलं की, इशान किशन प्लेइंग 11 चा भाग नसेल. त्यामुळे केएल राहुल पुढच्या काही सामन्यात विकेटकीपर म्हणून टीममध्ये खेळताना दिसेल.
आधी सुद्धा विकेटकीपर म्हणून खेळलाय
केएल राहुल या सीरीजआधी काहीवेळा विकेटकीपर म्हणून टीम इंडियामध्ये खेळला आहे. या सीरीजमध्येही तो याच रोलमध्ये दिसेल. केएल राहुलच्या बॅटिग ऑर्डरमध्येही बदल दिसेल. तो बऱ्याचदा रोहित शर्मासोबत ओपनिंगला दिसला होता. पण आता तो मीडिल ऑर्डरमध्ये दिसेल.
वनडेसाठी अशी आहे टीम इंडिया
रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी , मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंह.