IND vs AUS : KL Rahul ला ड्रॉप करण्याची रोहित शर्मामध्ये हिम्मत आहे का? कशी असेल Playing 11

| Updated on: Feb 28, 2023 | 2:40 PM

IND vs AUS Test : प्लेइंग 11 बद्दल एक मोठा प्रश्न भारतीय टीम मॅनेजमेंटसमोर आहे. केएल राहुलला आणखी एक संधी मिळेल की, शुभमन गिलवर विश्वास दाखवला जाईल.

IND vs AUS : KL Rahul ला ड्रॉप करण्याची रोहित शर्मामध्ये हिम्मत आहे का? कशी असेल Playing 11
Follow us on

IND vs AUS Test : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत तिसऱ्या कसोटीच काऊंटडाऊन सुरु झालय. काही तासांनंतर भारत-ऑस्ट्रेलियाची टीम आमने-सामने असेल. सध्या सीरीजमध्ये टीम इंडिया 2-0 ने आघाडीवर आहे. आता ही आघाडी वाढवण्याचा प्रयत्न असेल. भारतासाठी प्लेइंग इलेव्हनच कॉम्बिनेशन महत्त्वाच आहे. पहिल्या दोन कसोटीसाठीचा संघ कायम ठेवण्यात येईल, की इंदोर कसोटीत बदल दिसेल? हा प्रश्न आहे.

प्लेइंग इलेव्हनमध्ये केएल राहुलचा समावेश करायचा की, नाही हा टीम मॅनेजमेंटसमोर मुख्य प्रश्न आहे. केएल राहुलला आणखी एक संधी मिळेल की, शुभमन गिलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार ते उद्या समजेल.

राहुल आणि गिलमध्ये कोण?

टीम इंडियाच्या नेट्समधील जे फोटो समोर आलेत, त्यावरुन केएल राहुल आणि शुभमन गिलचे फिफ्टी-फिफ्टी चान्सेस आहेत. दोघेही सराव करताना दिसले. दोघांवरही टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड यांची नजर आहे. शुभमन गिल प्रॅक्टिस करताना आक्रमक वाटला. तेच राहुलने डिफेन्सवर जास्त लक्ष केंद्रीत केलं होतं. शुभमन गिल कदाचित या कसोटीत खेळू शकतो. त्याचं कारण आहे, राहुल द्रविड यांनी स्वत: चेंडूने शुभमनला सराव दिला.

टीम इंडियाचा मीडल ऑर्डर निश्चित

या दोघांमध्ये टीम मॅनेजमेंट कोणाला निवडणार? ते उद्या समजेल. मीडल ऑर्डरमध्ये काही बदल होण्याची शक्यता नाहीय. पुजारा, कोहली आणि अय्यर मीडल ऑर्डर अजून बळकट बनवतात. विराटकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा आहे. त्याने आतापर्यंत 3 इनिंगमध्ये 76 धावा केल्या आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये विराटने 3 वर्षांपूर्वी शेवटच शतक झळकावलं होतं.

गोलंदाजीत बदल नाही

मागच्या दोन कसोटी सामन्यात केएस भरतने बॅटने विशेष कमाल दाखवलेली नाही. मात्र तरीही त्याला इंदोर कसोटीत संधी मिळण्याची शक्यता आहे. भरत 7 व्या नंबरवर फलंदाजीसाठी येईल. गोलंदाजी विभागात टीम इंडियात कुठलाही बदल होणार नाही. अक्षर पटेल, आर. अश्विन फक्त शानदार गोलंदाजीच करत नाहीय, त्यांनी बॅटने सुद्धा कमाल दाखवलीय. अक्षरने नागपूर कसोटीत 84 आणि दिल्लीत 74 धावा केल्या. अश्विन नागपूरमध्ये नाइट वॉचमन म्हणून आला होता. त्याने 23 आणि दिल्लीत 37 धावा केल्या. तेच शमी आणि सिराजने फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर टीमला गरज असताना विकेट मिळवून दिल्यात.
भारताची संभाव्य़ प्लेइंग XI

रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज