ढाका: टीम इंडियाचा बांग्लादेश विरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात दारुण पराभव झाला होता. टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर होती. त्यांना फक्त एक विकेटची गरज होती. पण मेहदी हसन मिराज आणि मुस्ताफिजूर रहमानने शानदार फलंदाजी केली. त्यांनी 10 व्या विकेटसाठी अर्धशतकी भागदारी केली. टीमला विजय मिळवून दिला. मिराज आऊट झाला असता, पण विकेटकीपर केएल राहुलने त्याचा सोपा झेल सोडला. त्यामुळे पराभवानंतर अनेकांनी राहुलला दोषी ठरवलं होतं. राहुलने बुधवारी दुसऱ्या वनडेत असं काही केलं की, सगळेच हैराण झाले.
राहुलमुळे पॅव्हेलियनमध्ये परतला
राहुलने यावेळी कॅच सोडली नाही, तर पकडली. बांग्लादेशचा फलंदाज सेट झाला होता. तो वेगाने धावा बनवत होता. टीम इंडियाला विकेटची गरज होती. त्याचवेळी केएल राहुलने शानदार कॅच पकडली. या कॅचमुळे महमुदुल्लाहला पॅव्हेलियनमध्ये परताव लागलं. त्याने 96 चेंडूत सात चौकारांच्या मदतीने 77 धावा केल्या. राहुलच्या जबरदस्त कॅचमुळे त्याला पॅव्हेलियनमध्ये परताव लागलं.
What a catch by KL Rahul, Umran Malik gets his 2nd wicket of the match. pic.twitter.com/ZtjS5Fk77k
— ” (@Sobuujj) December 7, 2022
कोणाच्या गोलंदाजीवर कॅच?
बांग्लादेशच्या इनिंगमध्ये उमरान मलिक 47 वी ओव्हर टाकत होता. त्याने पहिला चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर शॉर्ट पीच टाकला. महमुदुल्लाहने बाहेर येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटला लागला नाही. पण ग्लोव्हजला लागून विकेटच्या पाठी गेला. चेंडूला वेग होता. राहुलने हवेत डाइव्ह मारुन हा झेल घेतला. उमरान मलिकचा मॅचमधील हा दुसरा विकेट होता.