मुंबई: बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेची (IPL) जोरदार सुरुवात झाली आहे. 26 मार्च ते 29 मार्च म्हणजे शनिवार ते मंगळवार या चार दिवसात सर्व दहा संघ आपला पहिला सामना खेळले आहेत. काही उत्कंठावर्धक सामने देखील यावेळी पहायला मिळाले. मंगळवारी पुण्यात महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर (Pune Mca Stadium) राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये (RR vs SRH) सामना झाला. राजस्थानने या लढतीत सनरायजर्सवर 61 धावांनी मोठा विजय मिळवला. सर्व दहा संघांनी आपला पहिला सामना खेळला आहे. त्यामुळे आता पॉइंट्स टेबल बद्दल जाणून घेऊया. राजस्थानने कालच्या सामन्यात धावांच्या मोठ्या फरकाने एकतर्फी विजय मिळवला. संजू सॅमसन राजस्थानच्या विजयाचा हिरो ठरला. अन्य फलंदाजांनीही त्याला चांगली साथ दिली.
पहिल्या टप्प्यात कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स, गुजरात टायन्स आणि राजस्थान रॉयल्स यांनी आपले सलामीचे सामने जिंकेल आहेत. सर्वच टीम्सच्या खात्यात दोन पॉइंटस जमा झाले आहेत. सर्वच संघांचे समान गुण असतात, त्यावेळी कुठला संघ कुठल्या स्थानावर रहाणार हे नेट रनरेटच्या आधारावर ठरते. सध्यातरी या शर्यतीत राजस्थान रॉयल्सने पहिलं स्थान मिळवलं आहे. काल आपल्या स्फोटक फलंदाजीच्या बळावर राजस्थानने 210 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन सनरायजर्स हैदराबादला 149 धावांवर रोखलं. राजस्थानने स्पर्धेतील एका मोठ्या विजयाची नोंद केली.
READ – A complete batting domination from the @rajasthanroyals powered them to a mammoth total of 210-6 before the #RR bowlers, led by @yuzi_chahal, reduced #SRH to 149-7 – by @mihirlee_58
More here – https://t.co/EUQ4ndiWTt #TATAIPL #SRHvRR pic.twitter.com/3whbckH3K6
— IndianPremierLeague (@IPL) March 29, 2022
हैदराबादवरील विजयामुळे राजस्थानच्या खात्यात दोन पॉइंटस जमा झाले आहेत. मोठ्या विजयामुळे 3.050 च्या रनरेटसह ते पहिल्या स्थानावर आहेत. दिल्ली, कोलकाता, पंजाब आणि गुजरातपेक्षा राजस्थानचा रनरेट जास्त आहे. दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या स्थानावर आहे. दिल्लीचा NRR 0.914 आहे. दिल्लीने मुंबईला पराभूत केलं होतं. त्यानंतर पंजाब किंग्स तिसऱ्या नंबरवर आहे. त्यांनी RCB विरुद्ध 206 धावांचे मोठे लक्ष्य पार केले होते. 0.697 त्यांचा नेट रनरेट आहे. कोलकाता 0.639 आणि गुजरातचा 0.286 रनरेट आहे.
संघ | सामने | जय | पराजय | पॉइंट्स | नेट रन रेट |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | 0.316 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 9 | 5 | 18 | 0.298 |
लखनौ सुपर जायंट्स | 14 | 9 | 5 | 18 | 0.251 |
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर | 14 | 8 | 6 | 16 | -0.253 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 7 | 7 | 14 | 0.204 |
पंजाब किंग्स | 14 | 7 | 7 | 14 | 0.126 |
कोलकाता नाइट रायडर्स | 14 | 6 | 8 | 12 | 0.146 |
सनरायजर्स हैदराबाद | 14 | 6 | 8 | 12 | -0.379 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 4 | 10 | 8 | -0.203 |
मुंबई इंडियन्स | 14 | 4 | 10 | 8 | -0.506 |
पराभूत संघांमध्ये लखनौ सुपर जायंट्स सहाव्या स्थानावर आहे. आयपीएलमध्ये डेब्यू करणाऱ्या लखनौच्या टीमचा दुसरी डेब्यु करणारी टीम गुजरात टायटन्सने पराभव केला होता. त्यांचा NRR(-0.286) आहे. चेन्नई सुपर किंग्स (-०.639) सातव्या स्थानावर आहे. (-0.697) सह बँगलोर आठव्या स्थानावर पाचवेळची विजेती मुंबई इंडियन्स (-0.914) नवव्या स्थानावर तर सनराजयर्स हैदराबाद शेवटच्या स्थानावर आहे. त्यांचा रनरेट (-3050) आहे.