IPL 2021: आयपीएल या जगातील सर्वात आव्हानात्मक क्रिकेट लीगमधील सर्वात बलाढ्य संघ म्हणून मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला ओळखलं जात. तब्बल 5 वेळा आयपीएलचा खिताब पटकावलेल्या मुंबईला यंदा प्लेऑफमध्ये जाण्यापासूनही वंचित राहिल अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आज पंजाब विरुद्धचा सामना त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तर पंजाब संघ देखील चांगला खेळ दाखवूनही अगदी शेवटच्या काही षटकात सामना गमावत आहे. त्यामुळे दोन्ही संघाना आज विजयाची अपेक्षा आहे.
गुणतालिकेचा विचार करता पंजाब किग्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघानी 10 पैकी 4 सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोघांच्या खात्यात 8 गुण आहेत. पण पंजाबचा रनरेट -0.271 असून मुंबईचा रनरेट -0.551 आहे. त्यामुळे पंजाब पाचव्या तर मुंबई सातव्या स्थानावर आहे.
आयपीएलच्या इतिहासात मुंबई आणि पंजाब 27 वेळा आमने-सामने आले आहेत. यामध्ये दोन्ही संघानी एकमेंकाना तोडीस तोड खेळ केला आहे. केवळ एका विजयाच्या फरकाने मुंबई पुढे आहे. मुंबईने 14 सामने जिंकले असून पंजाबने 13 सामने जिंकले आहेत. दरम्यान आज होणारा सामना अबुधाबीच्या शेख जायद स्टेडियममध्ये होणार आहे. या मैदानाचा विचार करता याठिकाणी दोन्ही संघ एकमेंकाविरुद्ध एकच सामना खेळले असून तो सामना मुंबईनेच जिंकला आहे.
आजच्या सामन्यात दोन्ही संघाचे संभाव्य 11
मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा (कर्णधार) क्विंटन डिकॉक, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, कायरन पोलार्ड , अॅडम मिल्ने, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट.
पंजाब किंग्स- केएल राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), मयांक अगरवाल, ख्रिस गेल, निकोलस पुरन, दीपक हुडा, शाहरुख खान, ख्रिस जॉर्डन, आदिल रशिद, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग.
हे ही वाचा
(Know Head to head of todays match MI vs PBKS match and Know probable playing 11 for Todays IPL Match in Mumbai Indians vs Punjab Kings)