मुंबई: IPL 2022 स्पर्धा संपल्यानंतरही भारतीय खेळाडूंना फार विश्रांती मिळणार नाहीय. T 20 वर्ल्ड कप पर्यंत भारतीय क्रिकेट संघाचं वेळापत्रक खूपच व्यस्त आहे. श्वास घ्यायलाही त्यांच्याकडे वेळ नाहीय. असं म्हटल्यास हरकत नाही. भारतीय क्रिकेट संघांची मालिकांची गाडी T 20 World cup 2022 पर्यंत थांबणार नाहीय. भरगच्च क्रिकेट मालिकांच वेळापत्रक तयार आहे. यामध्ये खेळाडूंमसमोर स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्याचं आवाहन असेल. भारताची पुढची मालिका 9 जून पासून सुरु होत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa Series) भारतीय संघ पाच टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत हे व्यस्त वेळापत्रक कायम असेल. पुढचे 6 महिने दमवून टाकणारे आहेत. भारतीय टीम मॅनेजमेंटसमोर खेळाडूंच वर्कलोड मॅनेज करण्याचही चॅलेंज असेल.
जून महिन्यातच भारतीय संघ दोन देशांविरुद्ध मालिका खेळणार आहे. त्यानंतर जुलै-ऑगस्टमध्ये इंग्लंड-वेस्ट इंडिज विरुद्ध मालिका खेळायची आहे. आशिया चषकाआधी भारतीय संघाला श्रीलंकेलाचा सामना करायचा आहे. आशिया चषकाचं आयोजन ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये करण्यात आलय. टी 20 वर्ल्ड कप ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आहे. त्याआधी भारतीय संघ सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन T 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.
टीम इंडियाच्या व्यस्त कार्यक्रमावर एक नजर मारा. म्हणजे टीम इंडियाला कधी, कुठे आणि कुठल्या संघाविरुद्ध कुठल्या फॉर्मेटमध्ये खेळायचय ते समजेल. आधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच टी 20 सामन्यांची मालिका होईल. त्यानंतर आयर्लंड विरुद्ध दोन टी 20 सामने खेळायचेत. भारतीय संघ जून-जुलै मध्ये इंग्लंडचा दौरा करणार आहे. जिथे त्यांना 1 टेस्ट, 3 वनडे आणि 3 T-20 सामने खेळायचे आहेत. इंग्लंड नंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाईल. जुलै ते ऑगस्ट दरम्यान 3 वनडे आणि 5 टी 20 सामने खेळायचे आहेत.
भारतीय संघाला कुठल्या संघाविरुद्ध, कुठल्या महिन्यात किती सामने खेळायचेत ते समजून घ्या