मुंबई : भारतीय क्रिकेटपटू हार्दीक पंड्या (Hardik Pandya) आणि कृणाल पंड्या (Krunal Pandya) यांनी नुकतंच मुंबईत 30 कोटीचं घर विकत घेतलं. मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी पंड्या बंधूनी हे घर विकत घेतल्याने सध्या गुजरातमध्ये राहत असलेले पंड्या बंधू मुंबईत स्थायिक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकेकाळी मॅगी खाऊन दिवस काढलेल्या पंड्या बंधूनी स्वत:च्या मेहनतीच्या आणि खेळाच्या जोरावर कोट्यवधींची संपत्ती कमवली आहे. त्यांच्याकडच्या आलिशान गाड्यांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर अनेकदा दिसत असतात पण आता त्यांनी नवं घर घेतलं असून या घरात अनेक खास गोष्टी आहेत.
मूळात या घराचं ठिकाणही अत्यंत मध्यवर्ती आहे. मुंबईतील पंड्या बंधूचा हा फ्लॅट उच्चभ्रू वस्ती असणाऱ्या रुस्तमजी पॅरामाउंट याठिकाणी आहे. इथे अनेक बॉलीवुड अभिनेता-अभिनेत्रींचे फ्लॅट आहेत. दिशा पटानी, टायगर श्रॉफ यासारखे कलाकार याठिकाणी राहतात.
पंड्या बंधूनी विकत घेतलेला हा फ्लॅट 3 हजार 838 स्केयर फीटचा आहे. या फ्लॅटमध्ये तब्बल 8 बेडरूम्स आहेत.
पंड्या बंधूचा हा फ्लॅट अत्यंत आलिशान असून डीएनएच्या वृत्तानुसार हार्दिक आणि कृणालच्या या घरात सर्व सोयींयुक्त व्यायम शाळा, जिम्नॅशियम आहे. क्रिकेटपटू असल्याने सराव आणि आरोग्य तंदरुस्त ठेवण्यासाठी पंड्या बंधूनी जिमवर मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. याशिवाय एक स्वतंत्र गेमिंग झोन देखील या फ्लॅटमध्ये आहे. या सर्वासह रिलॅक्स होण्याकरता एक प्रायवेट स्विमिंग पूल आणि प्रायवेट थिएटर देखील या फ्लॅटमध्ये आहे.
इतर बातम्या
IND vs SL 3rd T20 Live : श्रीलंकेचा भारतावर दणदणीत विजय, टीम इंडियानं टी-20 मालिका गमावली
(Know special things inside hardik and krunal pandyas mumbais 30 crore house)