IPL 2022 Retention : जाणून घ्या कोणत्या संघाने कुठल्या खेळाडूला रिटेन केलं? वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर

| Updated on: Nov 30, 2021 | 11:23 PM

आयपीएल 2022 मध्ये खेळाडूंचे रिटेनशन पार पडले आहे. चेन्नई सुपर किंग्जने रवींद्र जाडेजा, एमएस धोनी, मोईन अली आणि ऋतुराज गायकवाड या चार खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे.

IPL 2022 Retention : जाणून घ्या कोणत्या संघाने कुठल्या खेळाडूला रिटेन केलं? वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर
IPL 2022 Retention
Follow us on

मुंबई : आयपीएल 2022 मध्ये खेळाडूंचे रिटेनशन पार पडले आहे. चेन्नई सुपर किंग्जने रवींद्र जाडेजा, एमएस धोनी, मोईन अली आणि ऋतुराज गायकवाड या चार खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. विशेष म्हणजे धोनीपेक्षा जाडेजाला जास्त पैसे मिळणार आहेत. जडेजाला 16 कोटी रुपये मिळतील. चेन्नईने धोनीला 12 कोटी, मोईन अलीला 8 कोटी आणि ऋतुराज गायकवाडला 6 कोटींमध्ये रिटेन केलं आहे.

आयपीएलच्या इतिहासात सर्वात यशस्वी कॅप्टन म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहित शर्माला मुंबई इंडियन्सने रिटेन करत विराट कोहलीपेक्षा जास्त पैसे दिले आहेत. रोहितला या सीझनसाठी तब्बल 16 कोटी रुपये मिळाले आहेत. मात्र विराट कोहलीला आरसीबीकडून 15 कोटी रुपयात रिटेन करण्यात आलं आहे. मुंबईकडून दुसरा खेळाडू जसप्रीत बुमराह रिटेन करण्यात आला आहे. त्याला यंदाचं आयपीएल खेळण्यासाठी 12 कोटी रुपये मिळणार आहेत. तर तिसरा खेळाडू सुर्यकुमार यादवचं 8 कोटी रुपयात रिटेन्शन करण्यात आलं आहे. मुंबईने कायरन पोलार्डचंही 6 कोटी रुपये देऊन रिटेन्शन केलं आहे.

RCB कडून विराट, मॅक्सवेल आणि सिराज रिटेन

आरसीबीकडून रिटेन करण्यात आलेल्या खेळाडुंमध्ये विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराजचा समावेश आहे. विराट कोहलीला यंदाच्या आयपीएलसाठी 15 कोटी रुपये मिळणार आहेत. तर ग्लेन मॅक्सवेल याला 11 कोटी रुपये मिळणार आहेत. तर तिसरा खेळाडू मोहम्मद सिराजला 7 कोटी रुपये मिळतील. त्याममुळे विराट कोहलीला यंदा पहिल्यांदाच रोहित शर्मापेक्षा कमी पैसे मिळाले आहेत. सर्वात मोठी बोली के. एल. राहुलवर लागण्याची शक्यता आहेत.

SRH कडून जम्मू काश्मीरच्या खेळाडूंवर विश्वास

सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनपूर्वी त्यांच्या संघात कायम ठेवलेल्या (रिटेन केलेल्या) खेळाडूंची घोषणा केली आहे. या फ्रेंचायझीने तीन खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. यामध्ये केन विल्यमसन, उम्रान मलिक आणि अब्दुल समद यांचा समावेश आहे. उम्रान आणि अब्दुल हे दोघेही अनकॅप्ड भारतीय खेळाडू आहेत आणि दोघेही जम्मू-काश्मीरचे आहेत. किवी संघाचा कर्णधार केन विल्यमसन हाच यापुढेही हैदराबाद संघाचा कर्णधार राहील. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने आयपीएल 2018 मध्ये अंतिम फेरी गाठली होती. त्याला फ्रेंचायझीकडून 14 कोटी रुपये मिळतील. उम्रान मलिक या जम्मू-काश्मीरच्या तरुण खेळाडूवर फ्रेंचायझीने विश्वास व्यक्त केला आहे. IPL 2021 मध्ये बदली खेळाडू म्हणून आलेल्या या खेळाडूने त्याच्या पेसच्या (वेगाच्या) जोरावर जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. यापूर्वी तो नेट गोलंदाज म्हणून संघासोबत होता. त्याला चार कोटी रुपये मिळतील. अब्दुल समद या जम्मू काश्मीरच्या आणखी एका वेगवान गोलंदाजावर फ्रेंचायझीने विश्वास दाखवला आहे. मधल्या फळीत तो फलंदाजीदेखील करतो. त्यालादेखील चार कोटी रुपये मिळणार आहेत.

पंजाबचा मयंक-अर्शदीपवर विश्वास, दिल्लीच्या संघात 4 खेळाडू कायम

पंजाबने 2 खेळाडूंना संघात कायम ठेवलं आहे. मयंक अग्रवालला 14 कोटींमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. तर अर्शदीप सिंगला 4 कोटी रुपये इतक्या रक्कमेत कायम ठेवण्यात आले. दिल्ली कॅपिटल्सने 4 खेळाडूंना संघात कायम ठेवलं. ऋषभ पंतला 16 कोटी रुपये, अक्षर पटेलला 9 कोटी रुपये मिळतील. पृथ्वी शॉला 7.5 कोटी आणि एनरिक नॉर्खियाला ​​6.5 कोटी रुपये मिळतील.

KKR कडून 4 तर RR कडून 3 खेळाडू रिटेन

कोलकाता नाईट रायडर्सने 4 खेळाडूंना रिटेन केलं आहे. आंद्रे रसेलला 12 कोटी, व्यंकटेश अय्यर आणि वरुण चक्रवर्ती यांना 8-8 कोटींमध्ये त्यांनी संघात कायम राखलं आहे. तर सुनील नारायणला 6 कोटींमध्ये कायम ठेवलं आहे. राजस्थान रॉयल्सने 3 खेळाडूंना रिटेन केलं आहे. संजू सॅमसनला 14 कोटी मिळणार आहेत. जॉस बटलरला 10 कोटींमध्ये तर यशस्वी जयस्वालला 4 कोटींमध्ये रिटेन केलं आहे.

जाडेजाला धोनीपेक्षा जास्त, रोहितला विराटपेक्षा जास्त पैसे

रविंद्र जडेजा आणि महेंद्रसिंह धोनीला मिळालेली रक्कम चाहत्यांना विचार करायला भाग पाडणारी आहे. कारण यंदाचं आयपीएल खेळण्यासाठी रवींद्र जडेजाला धोनीपेक्षा जास्त म्हणजे एकूण तब्बल 16 कोटी मिळणार आहेत तर महेंद्रसिंह धोनीला यंदाचं आयपीएल खेळण्यासाठी 12 कोटी रुपये मिळणार आहेत. आयपीएलच्या इतिहासात सर्वात यशस्वी कॅप्टन म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहित शर्माला मुंबई इंडियन्सने रिटेन करत विराट कोहलीपेक्षा जास्त पैसे दिले आहेत. रोहितला या सीझनसाठी तब्बल 16 कोटी मिळाले आहेत. मात्र विराट कोहलीला आरसीबीकडून 15 कोटी रुपयात रिटेन करण्यात आलं आहे.

इतर बातम्या

IPL 2022 Retention, Live Updates : मुंबईने 4, बँगलोरने 3 आणि पंजाबने 2 खेळाडू रिटेन केले

IPL 2022 Retention : मुंबईने 4 तर बँगलोरने 3 खेळाडूंना रिटेन केलं, रोहितला विराटपेक्षा जास्त पैसे

IPL 2022 Retention : CSK कडून रवींद्र जाडेजाला धोनीपेक्षा जास्त पैसे, ऋतुराज गायकवाडदेखील रिटेन

(know which team retained how many players with money, Rohit-Jadeja will get more Wealth than Dhoni-Virat)