KKR vs PBKS, IPL 2022: आयपीएलमध्ये तिसरा सामना खेळणाऱ्या कोलकाता नाईड रायडर्सने आज शानदार विजयाची नोंद केली. त्यांनी पंजाब किंग्सला सहा विकेटने नमवलं. कोलकाता नाइट रायडर्सच्या विजयाचे दोन हिरो होते. उमेश यादव आणि आंद्रे रसेल. उमेश यादवने भेदक गोलंदाजी करताना चार षटकात 23 धावा देत चार विकेट घेतल्या. त्यामुळे पंजाब किंग्सला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यांचा डाव 137 धावात आटोपला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या केकेआरची चार बाद 51 अशी स्थिती होती. पण आंद्रे रसेलने 31 चेंडून नाबाद 70 धावा फटकावत केकेआरच्या विजयावर शिक्कामोर्तब केल. या खेळीत रसेलने दोन चौकार आणि आठ षटकार लगावले.
CSK विरुद्धचा सामना जिंकल्यानंतर RCB विरुद्धच्या सामन्यात KKR चा पराभव झाला होता. त्यामुळे आज KKR चा विजय मिळवण्याचा प्रयत्न असेल.
पंजाब किंग्सने आपला पहिला सामना जिंकला आहे. RCB विरुद्ध एका मोठ्या धावसंख्येचा त्यांनी यशस्वी पाठलाग केला होता.
आंद्रे रसेलच्या 31 चेंडूतील नाबाद 70 धावांच्या खेळीच्या बळावर कोलकाता नाइट रायडर्सने पंजाब किंग्सवर सहा विकेट राखून विजय मिळवला. त्याने दोन चौकार आणि आठ षटकार लगावले. कोलकाताचा आयपीएलमधील हा दुसरा विजय आहे.
You are absolutely correct! Our Knights are at the top! ??#KKRHaiTaiyaar #KKRvPBKS #IPL2022 https://t.co/YQleYjKkjQ
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 1, 2022
आंद्रे रसेलने 12 व षटक टाकणाऱ्या ओडिन स्मिथची गोलंदाजी फोडून काढली. स्मिथच्या एका ओव्हरमध्ये चार सिक्स लगावले. एकूण 29 धावा वसूल केल्या. केकेआरच्या चार बाद 109 धावा झाल्या आहेत.
आंद्रे रसेलने ओडिन स्मिथची गोलंदाजीवर मिडविकेटला सलग दोन जबरदस्त षटकार ठोकले.
आंद्रे रसेलची फटकेबाजी सुरु आहे. त्याने 15 चेंडूत 21 धावा करताना दोन षटकार लगावले आहेत. 11 षटकात चार बाद 81 अशी केकेआरची स्थिती आहे.
9 षटकात केकेआरच्या चार बाद 56 धावा झाल्या आहेत. अजिंक्य रहाणे (12) आणि वेंकटेश अय्यरने (3) आज पुन्हा एकदा निराश केलं. कॅप्टन श्रेयस अय्यर चांगली फलंदाजी करत होता. पण राहुल चाहरच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो राबाडाकरवी 26 धावांवर बाद झाला. त्याने आपल्या खेळीत पाच चौकार लगावले. नितीश राणा आजही फेल ठरला. राहुल चाहरने त्याला शुन्यावप पायचीत पकडलं.
केकेआरच्या भेदक गोलंदाजीसमोर किंग्स इलेव्हन पंजाबचा डाव 137 धावात संपुष्टात आला आहे. उमेश यादवने सर्वाधिक चार, टिम साउदीने दोन तर शिवम मावी, सुनील नरेन आणि आंद्रे रसेलने प्रत्येकी एक विकेट घेतला. पंजाबकडून भानुका राजपक्षेने सर्वाधिक 31 धावा केल्या. डावाच्या अखेरीस राबाडाने 25 धावा केल्या. त्यामुळे पंजाबला 137 धावांपर्यंत पोहोचता आले.
We couldn’t have asked for more! Onto our batters now ?#KKRHaiTaiyaar #KKRvPBKS #IPL2022 pic.twitter.com/c2Zlbfyx9b
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 1, 2022
पंजाबच्या 120 धावांवर 8 बाद झाले आहेत.
4, 4, and now a 6! ?
KG, we need more! https://t.co/lkYQWtaVaj
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 1, 2022
पंजाबच्या धावा 112 झाल्या असून 8 विकेट गेल्या आहेत.
कगिसो रबाडाने टीम साउदीच्या बॉलवर चौका मारला
राहुल चाहर उमेशच्या बॉलवर आऊट, पंजाब किंग्स 102 वर 8 आऊट
What a chant!?#KKRHaiTaiyaar #KKRvPBKS #IPL2022 https://t.co/XcYOt2DNKE
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 1, 2022
उमेश चांगली फलंदाजी करतोय. हरप्रीत बरारला उमेशने आऊट केलं
Umesh! Umesh! Umesh! ?#KKRHaiTaiyaar #KKRvPBKS #IPL2022
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 1, 2022
पंजाबचे 102 धावांवर 6 आऊट
100 comes up for us!
Odean and Brar, keep fighting! ?#SaddaPunjab #IPL2022 #PunjabKings #KKRvPBKS #ਸਾਡਾਪੰਜਾਬ
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 1, 2022
शाहरुख खानला टिम साउदीने आऊट केलं. आता पंजाबचे सहा खेळाडू आऊट झाले आहेत. तर 97 धावांवर 6 आऊट
The Southee Express is unstoppable!!!! ?
What a remarkable achievement ?#KKRHaiTaiyaar #KKRvPBKS #IPL2022 pic.twitter.com/b1ac4zsLeE
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 1, 2022
पंजाब किंग्सची सहावी विकेट गेली आहे. शाहरुख खानला टिम साउदीने भोपळाही फोडू दिला नाही. शुन्यावर त्याला राणाकरवी झेलबाद केलं. सहा बाद 97 अशी स्थिती आहे.
पंजाब किंग्सचा डाव अडचणीत सापडला असून निम्मा संघ तंबूत परतला आहे. लिविंगस्टोन पाठोपाठ राज बावा तंबूत परतला आहे. सुनील नरेनने त्याला क्लीन बोल्ड केलं. राज बावाने 11 धावा केल्या. पाच बाद 85 धावा झाल्या आहेत.
SUNIL NARINE HAS KNOCKED RAJ BAWA OVER!!!
WE HAVE YET ANOTHER WICKET! #KKRHaiTaiyaar #KKRvPBKS #IPL2022 pic.twitter.com/hxyWHWGjEy
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 1, 2022
लिविंगस्टोन आणि राज बावाची जोडी मैदानात आहे. नऊ षटकात चार बाद 78 धावा झाल्या आहेत. उमेश यादवने लिविंगस्टोनची विकेट काढली. त्याने 19 धावा केल्या.
आठ षटकात पंजाब किंग्सच्या तीन बाद 70 धावा झाल्या आहेत. लिविंगस्टोन 14 आणि राज बावा तीन धावांवर खेळतोय.
टिम साउदीच्या षटकात लियाम लिविंगस्टोनने पुढे येऊन सुंदर चौकार लगावला. पाचव्या चेंडूवर साउदीने शिखर धवनला विकेटकिपर सॅम बिलिंग्सकरवी झेलबाद केले. धवनने 16 धावा केल्या. त्याने एक चौकार आणि एक षटकार मारला. पावरप्लेच्या सहा ओव्हर्समध्ये पंजाबच्या तीन बाद 62 धावा झाल्या आहेत.
End of Powerplay.
PBKS – 62/3 (6.0)#KKRHaiTaiyaar #KKRvPBKS #IPL2022
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 1, 2022
शिवम मावीच्या षटकात आक्रमक फटकेबाजी करताना राजपक्षे आऊट झाला. राजपक्षेने नऊ चेंडूत 31 धावा केल्या. या खेळीत त्याने तीन चौकार, तीन षटकार लगावले. बाद होण्याआधी शिवम मावीच्या चार चेंडूत तीन षटकार आणि एक चौकार लगावला. चार षटकात पंजाबच्या दोन बाद 43 धावा झाल्या आहेत.
REDEEMED!#KKRHaiTaiyaar #KKRvPBKS #IPL2022 pic.twitter.com/fk7A7t7TAX
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 1, 2022
तिसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर स्टेपआऊट होऊन शिखर धवनने उमेश यादवला सुंदर षटकार ठोकला. तीन षटकांअखेरीस पंजाब किंग्सच्या एक बाद 21 धावा झाल्या आहेत.
Dhawan goes downtown! ?
Meets it off the meat and it clears the fence. Match da pehla biggie ?#SaddaPunjab #IPL2022 #PunjabKings #KKRvPBKS #ਸਾਡਾਪੰਜਾਬ
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 1, 2022
दोन षटकात पंजाबच्या एक बाद 7 धावा झाल्या आहेत. टीम साउदीच्या शेवटच्या चेंडूवर राजपक्षेने चौकार मारला. राजपक्षे-धवनची जोडी मैदानात आहे.
First boundary of the innings! ?
Bhanuka lifts it cleanly over extra-cover ?#PBKS – 7/1 (2)#SaddaPunjab #IPL2022 #PunjabKings #KKRvPBKS #ਸਾਡਾਪੰਜਾਬ
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 1, 2022
PBKS विरुद्ध KKR सामना सुरु झाला आहे. उमेश यादवने पहिलं षटक टाकलं. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर उमेश यादवने कॅप्टन मयंक अग्रवालला बाद केलं. अवघ्या एक रन्सवर पायचीत पकडलं. एक बाद 2 धावा अशी पंजाबची स्थिती आहे.
WICKET IN THE FIRST OVER YET AGAIN!!! ??
Mayank departs and Umesh has his first of the game! #KKRHaiTaiyaar #KKRvPBKS #IPL2022 pic.twitter.com/4NKEYA9Rfk
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 1, 2022
मयंक अग्रवाल (कॅप्टन), शिखर धवन, लियाम लिविंगस्टन, भानुका राजपक्षे (विकेटकिपर), शाहरुख खान, ओडियन स्मिथ, राज बावा, अर्शदीप सिंह, हरप्रीत बराड, कगिसो रबाडा, राहुल चाहर
अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, नितीश राणा, श्रेयस अय्यर, (कॅप्टन), सॅम बिलिंग्स, (विकेटकिपर) अँड्रे रसेल, शिवम मावी, सुनील नरेन, टीम साऊदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती
Here’s how we line up for #KKRvPBKS! ?
Sheldon makes way for Shivam Mavi.@winzoofficial #KKRHaiTaiyaar #IPL2022 pic.twitter.com/OZ8eBviRxJ
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 1, 2022