नवी दिल्ली : पुढच्या महिन्यापासून देशात वनडे वर्ल्ड कप 2023 टुर्नामेंटला सुरुवात होत आहे. यंदा भारत वनडे वर्ल्ड कपच यजमानपद भूषवत आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात वनडे वर्ल्ड कपचे सामने रंगणार आहेत. कालच अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली बीसीसीआयच्या निवड समितीने वर्ल्ड कपसाठी टीम निवडली. काल 15 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला. ‘संतुलन आणि खोली’ या दोन शब्दांवर कॅप्टन रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांनी जोर दिला. 15 सदस्यीय टीम निवडताना बॅलन्स आणि डेप्थ .या दोन घटकांचा प्रामुख्याने विचार करण्यात आला. “आम्हाला फलंदाजी आणि गोलंदाजीत ती खोली तयार करायची आहे. मागच्या काही वर्षात ही उणीव जाणवली” असं रोहित म्हणाला.
“आशिया कपमध्ये पहिल्या सामन्यात शेवटी आम्ही थोडे कमी पडलो. 8,9,10,11 नंबरच्या फलंदाजाने सुद्धा बॅटने योगदान दिलं पाहिजे. शेवटी येणाऱ्या 15-20 धावांमुळे सुद्धा फरक पडतो” असं रोहितच मत आहे. वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या टीममध्ये मुंबईकर शार्दुल ठाकूरची सुद्धा निवड झाली आहे. ऑलराऊंडर क्षमता हे शार्दुल ठाकूरची निवड होण्यामागे मुख्य कारण आहे. हार्दिक पांड्या जेव्हा दुखापतीने ग्रस्त होता, तेव्हा शार्दुल ठाकूर त्याला योग्य पर्याय आहे, म्हणून चर्चा सुरु होती. शार्दुल आठव्या नंबरवर खेळणार आहे. त्यामुळे फलंदाजीत रोहीतकडे एक चांगला पर्याय उपलब्ध होतो. शार्दुल कसोटीमध्ये अनेकदा टीम इंडियासाठी संकटमोचक बनला आहे. त्याने अर्धशतकी खेळी केली आहे.
काय म्हटलं श्रीकांत यांनी ?
शार्दुल ठाकूरची वर्ल्ड कप टीममध्ये निवड झाल्याने मुंबईकर क्रिकेटचाहते खुश आहेत. पण बीसीसीआयचे माजी चीफ सिलेक्टर कृष्णचारी श्रीकांत यांना शार्दुलची निवड पटलेली नाही. “शार्दुलने अजून त्याची ऑलराऊंडर क्षमता सिद्ध केलेली नाही. 8 व्या नंबरवर बॅटिंगची क्षमता असलेल्या गोलंदाजाची गरज नाही. त्याठिकाणी स्पेशलिस्ट फिरकी गोलंदाज किंवा वेगवान गोलंदाजाची निवड करता येऊ शकते” असं कृष्णमचारी श्रीकांत यांचं मत आहे.
आयसीसी वर्ल्ड कप 2023 साठी टीम इंडिया |
रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव.