कोलंबो : भारताचे युवा शिलेदार श्रीलंका सर करण्यासाठी सज्ज झाले आहेत. तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका भारत आणि श्रीलंका संघात खेळवण्यात येणार आहे. 13 जुलैपासून सुरु होणारी ही मालिका कोरोनाच्या संकटामुळे आता 18 जुलैपासून सुरु होणार आहे. मालिका सुरु होण्यापूर्वी थोडं रिलॅक्स होण्याकरता भारतीय खेळाडू मजा मस्ती करत आहेत. बुधवारी बीसीसीआयने खेळाडू इनडोअर खेळ खेळत असल्याचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर आता फिरकीपटू कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) ज्यांना प्रेमाने ‘कुल्चा’ म्हटंल जात. त्या दोघांचा दम शेराज खेळतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
बहुधा दमशेराज या खेळात एकजण चित्रपटांच्या नावांना इशाऱ्याद्वारे समोर बसलेल्यांना ओळखायला लावतो. पण कुलदीप आणि चहल खेळत असलेल्या दमशेराजमध्ये चित्रपटांची नावं नाही तर भारतीय खेळाडूंची नाव ओळखली जात आहेत. ज्यामध्ये कुलदीप अभिनय करतोय तर चहल हा त्याच्या अभिनयाने खेळाडूंची नाव ओळखण्याचा प्रय्तन करत आहे. विशेष म्हणजे कुलदीपने केलेल्या अभिनयाद्वारे चहलने सर्वच्या सर्व खेळाडूंची नाव अचूक ओळखली आहेत. तर नेमक्या कुलदीपने कशा अॅक्शन केल्या ते तुम्हीच पाहा…
Fun guaranteed when “Kul-Cha” are in one frame ? ?
Who is excited to watch this duo in action in the #SLvIND series? #TeamIndia ??@imkuldeep18 | @yuzi_chahal pic.twitter.com/pkpRPn9JfV
— BCCI (@BCCI) July 15, 2021
या संपूर्ण दौऱ्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात मर्यादीत षटकांचे सामने पार पडणार आहेत. ज्यामध्ये तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांचा समावेश आहे. आधी 13 जुलै रोजी सामन्यांना सुरुवात करण्यात येणार होती. पण कोरोनाच्या संकटामुळे सामने पुढे ढकलण्यात आले आहेत.
सामन्यांचे वेळापत्रक
हे ही वाचा :
IND vs SL : पहिल्या एकदिवसीय सामन्यात ‘हा’ सलामीवीर संघाबाहेर, दुखापतीमुळे मुकणार पहिला सामना
ऋषभ पंतला कोरोना, आता विराट कोहलीचा हुकमी एक्का इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरणार?
मोठी बातमी : ऋषभ पंतला कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग, टीम इंडियाला मोठा झटका, आता कीपर कोण?
(Kuldeep Yadav and Yuzvendra Chahal Playing Dum Charade Before India vs Sri Lanka Matches BCCI Shares Video)