IND vs SL 2nd ODI: मॅच जिंकूनही कुलदीप यादवला ड्रेसिंग रुममध्ये का सुनावलं?

| Updated on: Jan 13, 2023 | 1:37 PM

कुलदीप यादवने फ्रि हिटवर मारलेल्या एका शॉटबद्दल ड्रेसिंग रुममध्ये त्याला काही गोष्टी बोलण्यात आल्या. "मी आता याच्यावर काम करीन. संधी मिळेल, तेव्हा चांगली कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल" असं कुलदीप चहलला म्हणाला.

IND vs SL 2nd ODI: मॅच जिंकूनही कुलदीप यादवला ड्रेसिंग रुममध्ये का सुनावलं?
kuldeep yadav
Image Credit source: PTI
Follow us on

कोलकाता: कुलदीप यादवने पुन्हा एकदा त्याच्या फिरकीने, तो मोठा मॅचविनर असल्याच सिद्ध केलय. कोलकाता वनडेमध्ये कुलदीप यादवला युजवेंद्र चहलच्या जागी संधी मिळाली. या खेळाडूने आपल्या फिरकीने श्रीलंकन टीमला धक्का दिला. कुलदीप यादवने 10 ओव्हरमध्ये 51 धावा देऊन 3 विकेट काढल्या. कुलदीप यादवला या कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. सामना संपल्यानंतर कुलदीप यादवने युजवेंद्र चहलसोबत चर्चा केली. ज्याचा व्हिडिओ बीसीसीआय टीव्हीने पोस्ट केलाय. कुलदीप यादवने या व्हिडिओत, ड्रेसिंग रुममध्ये त्याला काही गोष्टी सुनावण्यात आल्याचा खुलासा केला.

कशावरुन कुलदीपला सुनावलं

कुलदीप यादवने फ्रि हिटवर मारलेल्या एका शॉटबद्दल ड्रेसिंग रुममध्ये त्याला काही गोष्टी बोलण्यात आल्या. “फ्रि हिटवर मी कट मारुन फिल्डरच्या डोक्यावर चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू सरळ हातामध्ये गेला. यासाठी मला ड्रेसिंग रुममध्ये बरच काही बोललं गेलं. मी आता याच्यावर काम करीन. संधी मिळेल, तेव्हा चांगली कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल” असं कुलदीप चहलला म्हणाला.

कोलकाताच्या विकेटवर कुलदीपने कशी गोलंदाजी केली?

कुलदीप यादवने सांगितलं की, “कोलकाता वनडेसाठी त्याने जास्त काही प्लानिंग केलं नव्हतं. मी जास्त प्लान केलं नव्हतं” “स्पिनर्ससाठी कोलकाताची विकेट फार चांगली नसेत, कारण चेंडू बॅटवर येतो. मी गुड लेंग्थवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. विकेट टू विकेट गोलंदाजीचा प्रयत्न केला. विकेटच्यामध्ये चेंडू टाकून चेंडू आता आणि बाहेर आणण्याचा प्रयत्न केला” असं कुलदीपने सांगितलं.

कुलदीप यादवने बदलली मानसिकता

कुलदीप यादवने त्याची मानसिकता बदलल्याच सांगितलं. “आधी मी विकेट घेण्याचा, चांगलं प्रदर्शन करण्याचा विचार करायचो. पण आता मी फक्त गोलंदाजी चांगली करायची आहे, एवढाच विचार करतो. कमीत कमी खराब चेंडू टाकण्याचा प्रयत्न असतो” असं कुलदीप म्हणाला. “शनाकाला बाद करणं हा माझा फेव्हरेट विकेट होता. शनाका चांगल्या फॉर्ममध्ये आहे. टीम मीटिंगमध्ये शनाकाला कसं बाद करायच, त्याबद्दल चर्चा झाली.शनाकाला बाद केल्यामुळे मी निश्चित आनंदी आहे” असं कुलदीपने सांगितलं.

युजवेंद्र चहलच कौतुक

युजवेंद्र चहलने मॅचच्या आधी टीप्स दिल्याच कुलदीपने सांगितलं. “मॅचच्याआधी तुम्ही दिलेल्या टिप्स उपयोगाला आल्या. टेस्ट फॉर्मेटमधून मी वनडे खेळायला आलो होतो. तू सतत टी 20 आणि वनडेमध्ये खेळत होता. त्यामुळे तू दिलेला सल्ला उपयोगाला आला” असं कुलदीप म्हणाला.