IND vs SL 3RD ODI Match: टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या वनडे सीरीजच्या दुसऱ्या सामन्यात 4 विकेटने विजय मिळवला. या मॅचमध्ये चायनामन बॉलर कुलदीप यादव टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला. युजवेंद्र चहलला दुखापत झाल्यामुळे या मॅचमध्ये कुलदीप यादवला संधी मिळाली होती. कुलदीप यादवने मिळालेल्या संधीच पुरेपूर सोन केलं. तो ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराचा मानकरी ठरला. इतका शानदार परफॉर्मन्स करुनही कदाचित कुलदीपला पुढच्या मॅचमध्ये संधी मिळणार नाही, असं बोललं जातय. त्यामागे काय कारण आहे, ते जाणून घ्या.
कुलदीपला बाहेर करतील, असं फॅन्सना का वाटतय?
कुलदीप यादवने काल श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या वनडे मॅचमध्ये 10 ओव्हर गोलंदाजी केली. त्याने 51 धावा देऊन 3 विकेट काढल्या. इतकं शानदार खेळूनही कुलदीपला तिसऱ्या मॅचमध्ये संधी मिळणार नाही, असं फॅन्सच म्हणणं आहे. कुलदीपने बांग्लादेश दौऱ्यावर पहिल्याच कसोटीत कमाल केली होती. त्याने 8 विकेट काढल्या होत्या. त्यासाठी त्याला ‘मॅन ऑफ द मॅचचा’ पुरस्कार मिळाला. पण पुढच्याच दुसऱ्या कसोटी सामन्यात कुलदीपला ड्रॉप करण्यात आलं. त्यामुळे टीम मॅनेजमेंट पुन्हा असं करु शकते, असं फॅन्सच म्हणणं आहे.
Kuldeep Yadav got Man of the match in the 2nd ODI. Now he is all set to get drop in the next match.#INDvsSL
— Farrago Abdullah Parody (@abdullah_0mar) January 12, 2023
Life of Kuldeep yadav be like: Roz utho, acha perform karo, Man of the match bano aur next match me drop ho jao.?
— the_sybarite_ (@Deeeeeppak) January 12, 2023
फॅन्सनी टीम मॅनेजमेंटवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह
दुसऱ्या वनडेत शानदार खेळ दाखवल्यानंतर कुलदीप टि्वटरवर ट्रेंड होऊ लागला. फॅन्सनी टीम मॅनेजमेंटला ट्रोल केलं. “दुसऱ्या वनडेत कुलदीप यादव तुला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला, आता तिसऱ्या वनडेत ड्रॉप होण्यासाठी तयार राहा” असं एका युजरने म्हटलं होतं. दुसऱ्या एका युजरने म्हटलं होतं की, “कुलदीपच जीवन असंच आहे, रोज उठ, चांगल खेळ, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवं आणि ड्रॉप हो”
अशी आहे कुलदीपची कामगिरी
27 वर्षाचा कुलदीप यादव आतार्यंत भारतासाठी 8 टेस्ट, 74 वनडे आणि 25 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलाय. त्याने टेस्टमध्ये 34, वनडेत 122 आणि टी 20 आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमध्ये एकूण 44 विकेट घेतलेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 126 विकेट आहेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने एक शतक आणि एका अर्धशतकाच्या बळावर 34 सामन्यात 874 धावा केल्या आहेत.