मुंबई: आमिर खानचा (Aamir Khan) बहुचर्चित चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’ (lal singh chaddha) आज रिलीज झाला. हॉलिवूड फिल्म ‘फॉरेस्ट गंप’चा हा चित्रपट रिमेक आहे. आमिर खान या चित्रपटात एका शिखाच्या भूमिकेत आहे. मानसिक दृष्टया फिट नसलेल्या व्यक्तीचा रोल आमिरने निभावला आहे. हा चित्रपट ज्यांनी पाहिलाय, ते सुपरहिट म्हणत आहेत. पण त्याचवेळी या चित्रपटाला काही जण विरोधही करत आहेत. इंग्लिश क्रिकेटपटू मॉन्टी पनेसरच (monty panesar) मत आहे की, या चित्रपटातून भारतीय सैन्य आणि शिखांचा अपमान करण्यात आला आहे. पनेसरने टि्वट करुन ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे. पनेसरचं हे टि्वट सोशल मीडियावर व्हायरल झालय.
“फॉरेस्ट गंप’ अमेरिकन सैन्यासाठी योग्य आहे. कारण अमेरिकेने व्हिएतनाम युद्धासाठी कमी आयक्यू असलेल्या पुरुषांची भर्ती केली होती. ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाने भारतीय सैन्य, सशस्त्र बल आणि शिखांचा अपमान केला आहे” असं पनेसरने आपल्या टि्वट मध्ये म्हटलय.
आमिर खानचा लाल सिंह चड्ढा चित्रपट थिएटर्स मध्ये प्रदर्शित झाला आहे. अनेक वाद सुरु असताना, हा चित्रपट रिलीज झालाय. लोकांनी हा चांगला चित्रपट असल्याचं म्हटलं आहे. काही लोक हा चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी करतायत. सोशल मीडियावर या चित्रपटाच्या विरोधात अभियानही सुरु आहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू आणि उत्तम फिरकी गोलंजदाज मॉन्टी पनेरसही आमिरच्या या चित्रपटावर नाराज आहे.
Forrest Gump fits in the US Army because the US was recruiting low IQ men to meet requirements for the Vietnam War. This movie is total disgrace to India Armed Forces Indian Army and Sikhs !!Disrespectful. Disgraceful. #BoycottLalSinghChadda pic.twitter.com/B8P2pKjCEs
— Monty Panesar (@MontyPanesar) August 10, 2022
हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’ 1994 मध्ये रिलीज झाला होता. त्यावेळी या चित्रपटाने 67 कोटी डॉलर्सची कमाई केली होती. टॉम हॉक्सचा हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आता बॉक्स ऑफिस वर आमिर खानचा हा चित्रपट किती कमाई करतो, त्याची उत्सुक्ता आहे. कारण आमिर खानचे मागचे काही चित्रपट फ्लॉप ठरले होते.