Sri lanka vs Australia Series: ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ (Australia Cricket Team) श्रीलंकेच्या दौऱ्यावर पोहोचला आहे. दोन्ही संघांमध्ये तीन T 20 आणि पाच वनडे सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. त्याआधी श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने (Srilanka Cricket Board) एक नवी रणनिती स्वीकारली आहे. श्रीलंकेने ऑस्ट्रेलियावर मात करण्यासाठी लसिथ मलिंगावर (Lasith Malinga) मोठी जबाबदारी सोपवली आहे. मलिंगाला श्रीलंकन क्रिकेट संघाचा बॉलिंग स्ट्रॅटजी कोच नियुक्त केला आहे. “श्रीलंकेचा माजी बॉलिंग लीजेंड आणि माजी वनडे, टी 20 टीमचा कॅप्टन लसिथा मलिंगाला बॉलिंग स्ट्रॅटजी कोच नियुक्त करण्यात आलं आहे. त्यांना शुभेच्छा” असं SLC ने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या संघांमध्ये होणाऱ्या मालिकेसाठी मलिंगावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी मलिंगाच्या अनुभवाचा श्रीलंकन गोलंदाजांना फायदा होईल. गोलंदाजांना टेक्निकल आणि रणनितीक मार्गदर्शन मिळेल. ऑन फिल्ड रणनिती बनवण्यासाठी याचा फायदा होईल, असं स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे. मलिंगाचा अनुभव, डेथ ओव्हर्समध्ये अचूक गोलंदाजी याचा टीमला टी 20 फॉर्मेटमध्ये फायदा होईल, असा SLC ला विश्वास आहे. या वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंकेचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता, त्यावेळी सुद्धा मलिंगाने अशीच भूमिका निभावली होती.
आयपीएल 2022 मध्ये लसिथ मलिंगाने राजस्थान रॉयल्सच्या बॉलिंग कोचची भूमिका निभावली होती. त्याच्या मार्गदर्शनाखाली राजस्थानचा संघ आयपीएलच्या फायनलमध्येही पोहोचला. फायनलमध्ये गुजरात टायटन्सकडून पराभव झाला. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला.