Legends league cricket : टीम इंडियाचे अनेक माजी क्रिकेटपटू लीजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत खेळतायत. याच खेळाडूंपैकी हरभजन सिंग एक आहे. तो इंडियन महाराजा टीमचा भाग आहे. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंडियन महाराजा टीमने चांगलं क्रिकेट खेळलय. हरभजन सिंगने सुद्धा आपल्या फिरकीची ताकत दाखवून दिली आहे.
भज्जी फक्त क्रिकेटच्या मैदानातच नाही, तर मैदानाबाहेरही आपली ताकत दाखवतोय. हरभजन सिंगने वाळवंटात कुस्ती खेळण्याची मजा घेतली.
असं केलं चीतपट
हरभजन सिंगने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय. यात तो आपला लहानपणीचा मित्र आणि माजी क्रिकेटपटू रितेंदर सिंह सोढीसोबत कुस्ती खेळताना दिसतोय. हरभजन आणि रितेंदर सिंह सोढीमध्ये कुस्तीचा सामना झाला. यामध्ये भज्जीने सोढीला हरवलं. हरभजन सिंगने आधी रितेंदरला ढकलल, पाडलं आणि त्याला चीतपट केलं.
ही शर्यतही जिंकला
सोढीला हरवल्यानंतर हरभजन सिंगने आपल्या आणखी एका मित्रासोबत शर्यत लावली. तिथेही हरभजनच जिंकला. हरभजन डाइव्ह मारुन विजय मिळवला. हरभजन सिंह लेजेंड्स लीग क्रिकेटमध्ये कमाल दाखवतोय. त्याने तीन सामन्यात पाच विकेट झटकलेत. त्याचा इकॉनमी रेट 6.44 प्रतिओव्हर आहे.
गौतम गंभीरची धमक
लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये गौतम गंभीरची धमक दिसून येतेय. इंडिया महाराजाचा कॅप्टन गौतम गंभीरने आतापर्यंत 3 सामन्यात 3 अर्धशतक झळकावली आहेत. त्याने 183 धावा केल्यात. धावा बनवण्याच्या बाबतीत तो टॉपवर आहे. तीन टीम्सच्या या लीगमध्ये इंडिया महाराजा 3 मॅचमध्ये एक विजय आणि दोन पराजयासह दुसऱ्या नंबरवर आहे. आशिया लायन्स तीन पैकी दोन सामने जिंकून टॉपवर आहे. वर्ल्ड जायंट्सने दोन पैकी एक सामना जिंकून तिसऱ्या नंबरवर आहे.