Legends League Cricket : सध्या वूमेन्स प्रीमियर लीग आणि पाकिस्तान सुपर लीगची चर्चा आहे. दोन्ही टुर्नामेंट्समध्ये सरस क्रिकेट पहायला मिळतय. त्याचवेळी माजी खेळाडूंच्या लेजेंड्स लीग क्रिकेटमुळे सुद्धा प्रेक्षकांच भरपूर मनोरंजन होतय. असाच एक सामना सुरेश रैना, हरभजन सिंग यांच्या इंडियन महाराजाचा ख्रिस गेल, एरॉन फिंच यांच्या वर्ल्ड जायंट्स बरोबर झाला. यात जायंट्सच्या टीमने विजय मिळवला. इंडियन महाराजाकडून विजयासाठी 140 धावांच टार्गेट मिळालं होतं.
या 140 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वर्ल्ड जायंट्सकडून ख्रिस गेलने आक्रमक बॅटिंग केली. त्याने 57 धावा करुन टीमच्या विजयाचा पाया रचला. गेलने आपल्या इनिंगमध्ये 9 चौकार आणि 1 षटकार मारला.
गेलची विकेट कोणी काढली?
गेलने या दरम्यान शेन वॉट्सनसोबत 51 धावांची भागीदारी केली. ख्रिस गेल 15 व्या ओव्हरमध्ये सुरेश रैनाच्या चेंडूवर आऊट झाला. त्यावेळी जायंट्सची धावसंख्या 125 धावा होती. 18.4 ओव्हर्समध्ये 7 विकेट गमावून जायंट्सने मॅच जिंकली. जायंट्सचा 2 सामन्यातील हा पहिला विजय आहे. ते तिसऱ्या स्थानावर आहेत. इंडियन महाराजा दुसऱ्या स्थानावर आहे. एशिया लायन्स पहिल्या स्थानावर आहे.
इंडियन महाराजाकडून कोणी जास्त धावा केल्या?
इंडियन महाराजाने 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट गमावून 139 धावा केल्या. इंडियन टीमकडून सुरेश रैनाने सर्वाधिक 49 धावा केल्या. पण तो अर्धशतक पूर्ण करु शकला नाही. त्याने 41 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकार लगावले.
रैनाशिवाय इरफान पठानने 20 चेंडूत वेगाने 25 धावा केल्या. यात 2 सिक्स आणि 1 फोर आहे. मनविंदर बिसलाने 34 चेंडूत 36 धावा केल्या. त्याशिवाय महाराजाचा दुसरा कुठलाही फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकला नाही.