ENG vs NED: 498 धावा, वर्ल्ड रेकॉर्ड झालेल्या सामन्यात लियाम लिव्हिंगस्टोनने 4,6,6,6,4,6 असं धुतंल, पहा VIDEO

| Updated on: Jun 17, 2022 | 8:36 PM

ENG vs NED: इंग्लंडने आज नेदरलँड विरुद्ध (England vs Netherlands) फक्त 4 विकेट गमावून 498 धावा फटकावल्या. वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक धावसंख्येचा हा नवीन विक्रम आहे.

ENG vs NED: 498 धावा, वर्ल्ड रेकॉर्ड झालेल्या सामन्यात लियाम लिव्हिंगस्टोनने 4,6,6,6,4,6 असं धुतंल, पहा VIDEO
ENG vs NED
Image Credit source: Fancode
Follow us on

मुंबई: इंग्लंडने वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावसंख्येचा नवीन विश्वविक्रम (England odi world Record) रचला आहे. इंग्लंडने आज नेदरलँड विरुद्ध (England vs Netherlands) फक्त 4 विकेट गमावून 498 धावा फटकावल्या. वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक धावसंख्येचा हा नवीन विक्रम आहे. इंग्लंडने जवळपास चार वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियाविरोधात एकदिवसीय सामन्यात 6 विकेटच्या मोबदल्यात 481 धावांचा विश्वविक्रम केला होता. इंग्लंडच्या फलंदाजांनी आज तुफानी बॅटिंग केली. इंग्लंडचा ऑलराऊंडर लियान लिव्हिंगस्टोनने (Liam Livingstone) तर नेदरलँडच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. नुकत्याच संपलेल्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत या फलंदाजाने आपली क्षमता दाखवून दिली होती. त्याने लांबलचक षटकार खेचले होते. ती त्याच्या फलंदाजीची ताकत आहे. आज नेदरलँड विरुद्धच्या सामन्यातही त्याने अशाच प्रकारची फलंदाजी केली. इंग्लंड आणि नेदरलँडमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. एम्स्टलवीन येथे पहिला सामना सुरु आहे. या सामन्यात लिव्हिंगस्टोनने 46 व्या षटकात 32 धावा चोपल्या.

इंग्लंडकडून तीन सेंच्युरी

इंग्लंडच्या फलंदाजांनी आज धमाकेदार बॅटिंग केली. इंग्लंडकडून आज तीन फलंदाजांनी शतक झळकावली. फिलीप सॉल्टने (93 चेंडूत 122), डेविड मलानने (109 चेंडूत 125) आणि जोस बटलरने (70 चेंडूत नाबाद 162) धावा फटकावल्या. डावाच्या अखेरीस लियान लिव्हिंगस्टोनने आपला जलवा दाखवला. त्याने अक्षरक्ष नेदरलँडच्या गोलंदाजांची हालत खराब केली. त्याने 22 चेंडूत नाबाद 66 धावा फटकावल्या. यात 6 चौकार आणि 6 षटकार होते.

कसं धुतलं?

इंग्लंडचा संघ मजबूत स्थितीमध्ये होता. त्यांच्या 446/4 अशी धावसंख्या होती. त्यावेळी नेदरलँडचा ऑलराऊंडर लोगान वॅन बीक गोलंदाजीला आला. लिव्हिंगस्टोनने वॅन बीकचं चौकाराने स्वागत केलं. त्यानंतर पुढच्या तीन चेंडूंवर सलग तीन षटकार मारले. त्यानंतर एक चौकार आणि षटकार लगावला. लिव्हिंगस्टोनने या ओव्हरमध्ये 32 धावा लुटल्या.