लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow super Giants) आज स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. इविन लुईस (Evin Lewis) आणि आयुष बदोनी (Ayush Badoni) लखनौच्या विजयाचे हिरो ठरले. पण त्याची पायाभरणी केएल राहुल आणि क्विंटन डि कॉकच्या जोडीने केली. नाणेफेक जिंकून केएल राहुलने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. चेन्नईचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. रॉबिन उथाप्पा, मोईन अलीने ज्या पद्धतीने सुरुवात केली, ते पहाता केएल राहुलचा निर्णय चुकला असंच वाटलं. चेन्नई सुपर किंग्सने आज प्रथम फलंदाजी करताना 210 धावांचा डोंगर उभारला. लखनौ सुपर जायंट्सला हे लक्ष्य पार कठीण जाईल असं वाटलं होतं. पण लखनौने शेवटच्या षटकापर्यंत खेचल्या गेलेल्या या सामन्यात आरामात विजयी लक्ष्य गाठलं.
लखनौ सुपर जायंट्सचा कॅप्टन केएल राहुलने टॉस जिंकला असून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. चेन्नई सुपर किंग्सची टीम प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरणार आहे.
ब्रेबॉर्न स्टेडियमवर आज सामना होत आहे. लखनौ आणि चेन्नईचे संघ पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहेत.
इविन लुईस आणि आयुष बदोनीने लखनौ सुपर जायंट्सच्या पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. चेन्नईने दिलेलं 210 धावांच लक्ष्य आरामात पार केलं. लुइसने 23 चेंडूत 55 धावांची तुफान खेळी केली. आयुष बदोनीने दुसऱ्या टोकाकडून 19 धावा फटकावल्या.
A 2⃣3⃣-ball FIFTY! ? ?
What a sensational knock this has been by Evin Lewis! ? ?
Follow the match ▶️ https://t.co/uEhq27KiBB#TATAIPL | #LSGvCSK | @LucknowIPL pic.twitter.com/z5LS5u7l2O
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2022
शिवम दुबेच्या 19 व्या षटकात लुईस आणि आयुष बदोनीने 25 धावा फटकावल्या. लुइसने अर्धशतकही पूर्ण केलं आहे. 23 चेंडूत तो 55 धावांवर खेळतोय.
इविन लुईस एकाबाजूने दमदार फलंदाजी करत असताना दीपक हुड्डा फटकेबाजीच्या प्रयत्नात 13 धावांवर आऊट झाला. ब्राव्होच्या गोलंदाजीवर जाडेजाने झेल घेतला. लखनौच्या चारबाद 172 धावा झाल्या आहेत.
चेन्नईला लखनौ सुपर जायंट्सचा महत्त्वाचा विकेट मिळाला आहे. क्विंटन डि कॉक 61 धावांवर आऊट झाला. प्रिटोरियसच्या गोलंदाजीवर धोनीने झेल घेतला. लखनौच्या तीन बाद 144 धावा झाल्या आहेत.
मनीष पांडेच्या रुपाने लखनौ सुपर जायंट्सला दुसरा झटका बसला आहे. अवघ्या पाच रन्सवर तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर ब्राव्होने त्याचा झेल घेतला. दोन बाद 107 अशी लखनौची स्थिती आहे.
लखनौचा धोकादायक फलंदाज केएल राहुल आऊट झाला आहे. प्रिटोरियसच्या गोलंदाजीवर रायुडूने केएल राहुलचा 40 धावांवर झेल घेतला. लखनौच्या एक बाद 101 धावा झाल्या आहेत.
लखनौचा सलामीवीर क्विंटन डि कॉकने आज लौकीकाला साजेसा खेळ केला. त्याने 34 चेंडूत अर्धशतक झळकावलं. 10 षटकात लखनौच्या 98 धावा झाल्या आहेत.
CSK प्रमाणे LSG ने ही दमदार सुरुवात केली आहे. नऊ षटकात बिनबाद 90 धावा झाल्या आहेत. राहुल 37 आणि डी कॉक 48 धावा खेळतोय.
CSK प्रमाणे LSG ने ही दमदार सुरुवात केली आहे. सलामीवीर क्विंटन डि कॉक (31) आणि केएल राहुल (19) चांगली फलंदाजी करत आहेत. सहा षटकात 55 धावा झाल्या आहेत.
लखनौ सुपर जायंट्सच्या दोन षटकात 11 धावा झाल्या आहेत. क्विंटन डि कॉक 6 आणि केएल राहुल एक रन्सवर खेळतोय.
चेन्नई सुपर किंग्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत 20 षटकात सात बाद 210 धावा केल्या आहेत. लखनौ सुपर जायंट्सला विजयासाठी 211 धावांचं लक्ष्य दिलं आहे. धोनीने सहा चेंडूत 16 धावा फटकावल्या. यात दोन चौकार आणि एक षटकार होता.
Thala Takkar Doi! ??#LSGvCSK #WhistlePodu #Yellove ?? pic.twitter.com/avaufg9YJb
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 31, 2022
शिवम दुबेच अर्धशतक अवघ्या एक रन्सने हुकलं. त्याने 30 चेंडूत 49 धावा केल्या. पाच चौकार आणि दोन षटकार लगावले. 19 षटकात csk च्या पाच बाद 199 धावा झाल्या आहेत. पहिल्याच चेंडूवर कव्हर्समध्ये धोनीने सिक्स आणि त्यानंतरच्या चेंडूवर चौकार मारला.
रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर अंबाती रायुडू क्लीन बोल्ड झाला आहे. रायुडूने 20 चेंडूत 27 धावा केल्या. यात दोन चौकार, दोन षटकार होते. चेन्नईच्या चार बाद 167 धावा झाल्या आहेत.
शिवम दुबे आणि अंबाती रायुडूची जोडी जमली आहे. 15 षटकात चेन्नईच्या तीन बाद 147 धावा झाल्या आहेत. शिवम दुबे 32 आणि रायुडू 20 धावांवर खेळतोय.
13 षटकात चेन्नईच्या तीन बाद 130 धावा झाल्या आहेत. शिवम दुबे 27 आणि अंबाती रायुडू 11 धावांवर खेळतोय.
12 षटकात चेन्नईच्या तीन बाद 118 धावा झाल्या आहेत. शिवम दुबे 16 आणि अंबाती रायुडू 11 धावांवर खेळतोय.
CSK ला तिसरा धक्का बसला आहे. मोईन अली 35 धावांवर आऊट झाला आहे. आवेश खानने त्याला क्लीन बोल्ड केलं. 11 षटकात चेन्नईच्या तीन बाद 112 धावा झाल्या आहेत.
आक्रमक फलंदाजी करणारा रॉबिन उथाप्पा हाफ सेंच्युरी झळकवल्यानंतर रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्याने 27 चेंडूत 50 धावा केल्या. यात आठ चौकार आणि एक षटकार होता. नऊ षटकात चेन्नईच्या दोन बाद 99 धावा झाल्या आहेत.
सात षटकात चेन्नईच्या एक बाद 82 धावा झाल्या आहेत.
रॉबिन उथाप्पाप्रमाणे दुसऱ्याबाजूने मोईन अलीही फटकेबाजी करतोय. पावरप्लेच्या सहाषटकात CSK च्या एकबाद 73 धावा झाल्या आहेत. क्रुणाल पंड्याच्या एक षटकात 16 धावा वसूल केल्या. उथाप्पा 45 आणि मोईन अली 21 धावांवर खेळतोय.
रॉबिन उथाप्पाची आक्रमक फलंदाजी सुरु आहे. तो चौफेर फटकेबाजी करतोय. अवघ्या पाच षटकात चेन्नईने 50 धावांचा टप्पा ओलांडला आहे. उथाप्पाने 20 चेंडूत 44 धावा फटकावल्या आहेत. यात आठ चौकार आणि एक षटकार आहे.
चार षटकात CSK च्या एक बाद 39 धावा झाल्या आहेत. रॉबिन उथाप्पा 30 आणि मोईन अली 6 धावांवर खेळतोय.
आवेश खानच्या गोलंदाजीवर मोईन अलीने शानदार षटकार लगावला.
सीएसकेला पहिला झटका बसला आहे. ऋतुराज गायकवाड रनआऊट झाला आहे. रवी बिश्नोईच्या चेंडू फेकीने गायकवाड रनआऊट झाला. तिसरं षटक सुरु आहे. चेन्नईच्या एक बाद 28 धावा झाल्या आहेत.
दुष्मंथा चमीराच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर उथाप्पाने चौकार लगावला. दोन षटकात CSK च्या 26 धावा झाल्या आहेत. रॉबिन उथाप्पा 20 आणि ऋतुराज गायकवाड दोन धावांवर खेळतोय.
दुष्मंथा चमीराच्या दुसऱ्या षटकात रॉबिन उथाप्पाने सुंदर षटकार लगावला.
रॉबिन उथाप्पा आणि ऋतुराज गायकवाड ही चेन्नईची सलामीची जोडी मैदानात आहे. पहिल्या षटकात चेन्नईच्या 14 धावा झाल्या आहेत.
आवेश खानच्या दुसऱ्या चेंडूवर चेन्नईचा सलामीवीर रॉबिन उथाप्पाने दुसरा चौकार लगावला.
आवेश खानच्या पहिल्याच चेंडूवर चेन्नईचा सलामीवीर रॉबिन उथाप्पाने चौकार लगावला.
केएल राहुल (कॅप्टन), क्विंटन डिकॉक, एविन लुइस, मनीष पांडे, दीपक हुड्डा, क्रुणाल पंड्या, आयुष बदोनी, रवी बिश्नोई, आवेश खान, दुष्मंता चमीरा, अँड्रयू टाय,
हमारे गयारह नवाब जो आज बढ़ाएंगे मैदान में लखनऊ की शान ?? #LSG #AbApniBaariHai #LSGvCSK #IPL2022 pic.twitter.com/jAzbjlkhVK
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) March 31, 2022
रवींद्र जाडेजा (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, मोइन अली, रॉबिन उथाप्पा, अंबाती रायडू, एमएस धोनी, शिवम दुबे, ड्वेन ब्राव्हो, तुषार देशपांडे, ड्वेन प्रीटोरियस आणि मुकेश चौधरी
Triple Change for the Lion up today! ???#LSGvCSK #WhistlePodu #Yellove ? pic.twitter.com/E21jzaJHzT
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 31, 2022