LSG vs DC Prithvi Shaw: IPL आधी फिटनेस टेस्टमध्ये फेल झालेल्या मुंबईकर पृथ्वी शॉ ने आज बॅटने दिलं उत्तर

| Updated on: Apr 07, 2022 | 8:38 PM

LSG vs DC IPL 2022: मागच्या काही महिन्यांपासून पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) सातत्याने टीकेचा सामना करतोय. आज अखेर त्याने आपल्या बॅटनेच उत्तर दिलं.

LSG vs DC Prithvi Shaw: IPL आधी फिटनेस टेस्टमध्ये फेल झालेल्या मुंबईकर पृथ्वी शॉ ने आज बॅटने दिलं उत्तर
पृथ्वी शॉ
Image Credit source: File photo
Follow us on

मुंबई: मागच्या काही महिन्यांपासून पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) सातत्याने टीकेचा सामना करतोय. आज अखेर त्याने आपल्या बॅटनेच उत्तर दिलं. पृथ्वी शॉ च्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित करण्यात येत होतं. त्याशिवाय स्थानिक क्रिकेटमध्येही त्याला यश मिळत नव्हतं. त्यामुळे भारतीय संघातही पृथ्वी शॉ ची निवड होऊ शकली नव्हती. आज लखनौ सुपर जायंट्स (LSG) विरुद्धच्या सामन्यात पृथ्वीची बॅट तळपली. या मुंबईकर फलंदाजाने चौफेर फटकेबाजी केली. दुसऱ्या षटकापासून त्याने लखनौच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. जेसन होल्डर, (Jason Holder) कृष्णाप्पा गौतम आणि आवेश खान यांच्या गोलंदाजीवर चौकार-षटकार ठोकले. कव्हर्स-मिडविकेट क्षेत्रात त्याने दमदार फटकेबाजी केली. पृथ्वीने आज 30 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्याने 34 चेंडूत 61 धावा फटकावल्या. फिरकी गोलंदाज कृष्णाप्पा गौतमच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करताना चेंडूने त्याच्या बॅटची कड घेतली. क्विंन डि कॉकने झेल घेण्यात कुठलीही चूक केली नाही. त्याने 9 चौकार आणि दोन षटकार लगावले.

‘माझी परिस्थिती माहित नसताना, तुम्ही…’

बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेआधी पृथ्वी शॉ च्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. पृथ्वी शॉ NCA मध्ये झालेल्या Yo-Yo टेस्टमध्ये फेल झाला होता. पृथ्वी शॉ ला यो-यो टेस्ट पास करण्यासाठी 16.5 गुण मिळवणं आवश्यक होतं. पण पृथ्वीला 15 पॉईंटसही मिळवता आले नाहीत. पृथ्वीसोबत यो-यो टेस्ट देणारा हार्दिक पंड्या आरामात ही टेस्ट पास झाला होता. पृथ्वी यो-यो टेस्टमध्ये फेल झाल्यानंतर त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. पृथ्वीने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करुन त्याने ट्रोलर्सना ‘तुम्ही तुमचं काम करा’ असं सुनावलं होतं. “माझी परिस्थिती माहित नसताना, तुम्ही माझ्याबद्दल मत बनवू नका. तुम्ही तुमचं काम करा” असं पृथ्वीने त्या मेसेजमध्ये म्हटलं होतं


पृथ्वी यो-यो टेस्टमध्ये फेल कसा झाला?

पृथ्वी शॉ यो-यो टेस्टमध्ये फेल कसा झाला? असा प्रश्न उपस्थित झाला होता. पृथ्वी शॉ सलग तीन रणजी सामने खेळला, त्यामुळे तो थकला होता. शॉ या तिन्ही सामन्यादरम्यान बायो-बबलमध्ये होता. त्यामुळे यो-यो टेस्ट दरम्यान त्याला अडचण आली. पृथ्वी यो-यो टेस्टमध्ये फेल झाला असला, तरी सामना जिंकून देण्याची त्याची क्षमता सर्वांना माहित आहे. दिल्ली कॅपिटल्सने पृथ्वीसाठी 7.50 कोटी रुपयाची मोठी किंमत मोजून त्याला रिटेन केलं.