मुंबई: वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये (LSG vs DC) सामना सुरु आहे. इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील हा 45 वा सामना आहे. हा सामना पाहण्यासाठी आज सुद्धा एक खास पाहुणी स्टेडियममध्ये उपस्थित आहे. ही पाहुणी आहे, इशा नेगी. इशा नेगी (Isha negi) ही दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंतची गर्लफ्रेंड आहे. मागच्या कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या सामन्याच्यावेळी सुद्धा इशा दिल्ली कॅपिटल्सला चिअर करण्यासाठी स्टेडियममध्ये आली होती. आज लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्याच्यावेळी ती प्रेक्षक गॅलरीत हजर आहे. इशाचा आजचा लूक सुद्धा खास आहे. तिने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला असून केसांना चंदेरी हेअर बँड लावला आहे. इशाचा हा लूक लक्षवेधी आहे.
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत क्रिकेट बरोबरच क्रिकेटपटूंच्या पत्नी, गर्लफ्रेंड यांची सुद्धा तितकीच चर्चा होते. स्टेडियममध्ये क्रिकेटपटूची पत्नी किंवा गर्लफ्रेंड हजर असेल, तर स्टेडियममधल्या कॅमेऱ्याचं तिच्याकडे विशेष लक्ष असतं. आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौमध्ये सामना सुरु आहे. या सामन्याच्यावेळी सुद्धा कॅमेऱ्याचं लक्ष इशाकडे आहे.
Rishab Pant’s GF Isha Negi Spotted At Stadium#RishabhPant #IPL2022 #DCvLSG #LSGvDC pic.twitter.com/BSe23my1aC
— Sexkar Dhewen ?? (@dhewenpopa) May 1, 2022
Isha negi is again in the stands to support #DelhiCapitals ❤️#LSGvDC #IPL2022 pic.twitter.com/kalxtAkCH2
— Shivam Jaiswal ?? ❤️ (@7jaiswalshivam) May 1, 2022
कालच्या गुजरात टायटन्स विरुद्ध आरसीबी सामन्याच्यावेळी नताशा आणि अनुष्काकडे कॅमेरा सारखा फिरत होता. आज इशा नेगीकडे सोशल मीडिया लक्ष ठेवून आहे. इशासाठी काही खास टि्वटही करण्यात आले आहेत.