IPL 2022 मध्ये आज दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये (DC VS LSG) सामना झाला. लखनौ सुपर जायंट्सने विजयाची हॅट्ट्रिक केली. चेन्नई सुपर किंग्स, सनरायजर्स हैदराबाद नंतर लखनौ सुपर जायंट्सने आज दिल्ली कॅपिटल्सला हरवलं. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात आयुष्य बदोनीने (Ayush Badoni) षटकार ठोकून लखनौच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. शार्दुल ठाकूर अखेरच षटक टाकत होता. सामना रंगतदार स्थितीत असताना आयुषने चौकार-षटकार ठोकून लखनौला तिसरा विजय मिळवून दिला. 6 विकेट आणि दोन चेंडू राखून विजय मिळवला. दिल्लीने विजयासाठी 150 धावांचे लक्ष्य दिले होते. लखनौने चार बाद 155 धावा केल्या. या विजयामुळे लखनौचा आत्मविश्वास उंचावला आहे. दिल्लीच्या संघातून आज एनरिच नॉर्खिया आणि डेविड वॉर्नर हे मोठे खेळाडू खेळले.
दिल्ली कॅपिटल्सला पृथ्वी शॉ ने चांगली सुरुवात करुन दिली. पावरप्लेमध्ये दिल्लीच्या बिनाबाद 52 धावा झाल्या होत्या. पृथ्वीने 34 चेंडूत 61 धावांची खेळी केली. पण पृथ्वी आऊट झाल्यानंतर सात धावात दोन विकेट गेल्या.
डेविड वॉर्नर आणि रोव्हमॅन पॉवेल हे पावर हिटर आहेत. पण दोघेही लौकीकाला साजेसा खेळ दाखवू शकले नाहीत. वॉर्नर चार आणि पॉवेल तीन धावांवर आऊट झाला.
लखनौच्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये धावा दिल्या. पण पृथ्वी शॉ आऊट झाल्यानंतर झटपट दोन विकेट घेतल्या व दिल्लीच्या धावगतीला वेसण घातली.
रवी बिश्नोईने डेविड वॉर्नर आणि रोव्हमॅन पॉवेल या दोन महत्त्वाच्या विकेट काढल्या. त्याने चार ओव्हर्समध्ये 22 धावा देत दोन विकेट काढल्या.
15 षटकानंतर हाणामारीच्या ओव्हर्समध्ये खासकरुन शेवटच्या तीन ओव्हर्समध्ये आवेश खान आणि जेसन होल्डरने फार धावा दिल्या नाहीत. त्यांनी ऋषभ पंत आणि सर्फराझ खानला जखडून ठेवलं. त्यामुळे चांगल्या सुरुवातीनंतर दिल्लीला 149 धावांपर्यंतच मजल मारता आली.
After a kadak two innings, #LSGvsDC comes to an end. Kaisa laga humaara भौकाल? ✅#AbApniBaariHai?#IPL2022 ? #bhaukaalmachadenge #lsg #LucknowSuperGiants #T20 #TataIPL #Lucknow #UttarPradesh #LSG2022 @My11Circle pic.twitter.com/8NDsqcfvbr
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 7, 2022
क्विंटन डि कॉक आणि केएल राहुल यांची चांगली सुरुवात दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी केली. क्विंटन डि कॉकने 153 च्या स्ट्राइक रेटने 52 चेंडूत 80 धावा केल्या. यात 9 चौकार आणि दोन षटकार होते.
मुस्ताफिझूर रहमान टाकत असलेल्या 19 व्या ओव्हरमध्ये कृणाल पंड्याने महत्त्वाची भूमिका बजावली. एक षटकार ठोकत या ओव्हरमध्ये 14 धावा काढल्या.