IPL 2022 मध्ये आज दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये (DC VS LSG) सामना झाला. लखनौ सुपर जायंट्सने विजयाची हॅट्ट्रिक केली. चेन्नई सुपर किंग्स, सनरायजर्स हैदराबाद नंतर लखनौ सुपर जायंट्सने आज दिल्ली कॅपिटल्सला हरवलं. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात आयुष्य बदोनीने (Ayush Badoni) षटकार ठोकून लखनौच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. शार्दुल ठाकूर अखेरच षटक टाकत होता. सामना रंगतदार स्थितीत असताना आयुषने चौकार-षटकार ठोकून लखनौला तिसरा विजय मिळवून दिला. 6 विकेट आणि दोन चेंडू राखून विजय मिळवला. दिल्लीने विजयासाठी 150 धावांचे लक्ष्य दिले होते. लखनौने चार बाद 155 धावा केल्या. या विजयामुळे लखनौचा आत्मविश्वास उंचावला आहे. दिल्लीच्या संघातून आज एनरिच नॉर्खिया आणि डेविड वॉर्नर हे मोठे खेळाडू खेळले.
लखनौ सुपर जायंट्सचा कॅप्टन के.एल.राहुलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दिल्ली कॅपिटल्सची टीम प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरणार आहे.
दिल्ली कॅपिटल्सची टीम एक विजय आणि एका पराभवासह सातव्या स्थानावर आहे. लखनौची टीम तीन सामन्यात दोन विजयांसह पाचव्या स्थानावर आहे.
लखनौ सुपर जायंट्सने विजयाची हॅट्ट्रिक केली. चेन्नई सुपर किंग्स, SRH नंतर LSG ने आज दिल्ली कॅपिटल्सला हरवलं. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात आयुष्य बदोनीने षटकार ठोकून लखनौच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. शार्दुल ठाकूर अखेरच षटक टाकत होता. सामना रंगतदार स्थितीत असताना आयुषने चौकार-षटकार ठोकून लखनौला तिसरा विजय मिळवून दिला. 6 विकेट आणि दोन चेंडू राखून विजय मिळवला. दिल्लीने विजयासाठी 150 धावांचे लक्ष्य दिले होते. लखनौने चार बाद 155 धावा केल्या.
Chota packet bada dhamaka! Badoni superstar. ✨
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 7, 2022
6 चेंडूत 5 धावांची गरज असताना दीपक हुड्डा मोठा फटका खेळताना कॅच आऊट झाला. शार्दुल ठाकूरने त्याची विकेट काढली. दीपकने 11 धावा केल्या.
मुस्ताफिझूर रहमान टाकत असलेल्या 19 व्या ओव्हरमध्ये 14 धावा काढल्या. कृणाल पंड्याने एक षटकार ठोकला.
शार्दुल ठाकूरने 18 व्या षटकात पाच धावा दिल्या. 12 बॉलमध्ये 19 रन्सची गरज
दमदार फलंदाजी करणारा क्विंटन डि कॉक अखेर 80 धावांवर आऊट झाला. कुलदीप यादवने त्याची विकेट काढली. 17 षटकात लखनौच्या तीन बाद 126 धावा झाल्या आहेत.
लखनौ सुपर जायंट्सच्या 15 षटकात दोन बाद 111 धावा झाल्या आहेत. क्विंटन डि कॉक 71 धावांवर आणि दीपक हुड्डा 6 धावांवर खेळतोय.
धोकादायक इविन लुइस आऊट झाला आहे. पाच धावांवर ललित यादवने त्याला कुलदीप यादवकरवी झेलबाद केलं. क्विंटन डि कॉकने अर्धशतक पूर्ण केलं आहे. तो 53 धावांवर खेळतोय. दीपक हुड्डा मैदानात आला आहे. 13 षटकात दोन बाद 90 धावा झाल्या आहेत.
लखनौला पहिला झटका बसला आहे. कॅप्टन केएल राहुल OUT झाला आहे. कुलदीप यादवने राहुलला 24 धावांवर पृथ्वी शॉ करवी झेलबाद केलं. 10.2 षटकात लखनौच्या एक बाद 76 धावा झाल्या आहेत.
Kuldeep strikes!
He entices KL and he takes the bait, with Prithvi pouching one in the deep.
More of the same ?#YehHaiNayiDilli #IPL2022 #LSGvDC
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 7, 2022
लखनौ सुपर जायंट्सच्या आठ ओव्हरमध्ये 62 धावा झाल्या आहेत. केएल राहुल 22 आणि क्विंटन डि कॉक 38 धावांवर खेळतोय.
पावरप्लेमध्ये लखनौच्या बिनबाद 48 धावा झाल्या आहेत. राहुल 10 आणि क्विंटन डि कॉक 36 धावांवर खेळतो.
लखनौच्या डावाला सुरुवात झाली आहे. पाच षटकात लखनौच्या बिनबाद 44 धावा झाल्या आहेत. क्विंटन डि कॉक 35 आणि केएल राहुल 9 धावांवर खेळतोय. एनरिच नॉर्खियाच्या एका ओव्हरमध्ये 19 धावा निघाल्या. यात तीन चौकार आणि एक षटकार लगावला.
डेथ ओव्हर्समध्ये लखनौच्या बॉलर्सनी चांगली गोलंदाजी केली. शेवटच्या दोन-तीन षटकात ऋषभ पंत आणि सर्फराझ खान या जोडीला मुक्तपणे फलंदाजी करु दिली नाही. निर्धारीत 20 षटकात दिल्लीच्या तीन बाद 149 धावा झाल्या आहेत. दिल्लीकडून सलामीवीर पृथ्वी शॉ ने सर्वाधिक 61 धावा केल्या. ऋषभने नाबाद 39 आणि सर्फराझने 36 नाबाद धावा केल्या.
We’ve made it to 1⃣4⃣9⃣
Onto our bowlers now ??#YehHaiNayiDilli #IPL2022 #LSGvDC
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 7, 2022
आवेश खानने टाकलेल्या 19 व्या षटकात फक्त सहा धावा. दिल्लीच्या तीन बाद 142 धावा. ऋषभ पंत 36 आणि सर्फराझ खान 33 धावांवर खेळतोय.
18 षटकात दिल्लीच्या तीन बाद 136 धावा झाल्या आहेत. ऋषभ पंत 31 आणि सर्फराझ खान 32 धावांवर खेळतोय.
ऋषभ पंतने 16 व्या षटकात फटकेबाजी केली. दिल्लीच्या तीन बाद 117 धावा झाल्या आहेत. पंत 28 आणि सर्फराझ खान 21 धावांवर खेळतोय.
15 षटकात दिल्लीच्या तीन बाद 99 धावा झाल्या आहेत. ऋषभ पंत 12 आणि सर्फराज खान 16 धावांवर खेळतोय.
दिल्लीची तिसरी विकेट गेली आहे. आक्रमक रोव्हमॅन पॉवेलला रवी बिश्नोईने तीन धावांवर बोल्ड केलं. 10.4 षटकात तीन बाद 74 धावा झाल्या आहेत.
दिल्लीला दुसरा झटका बसला आहे. लखनौला मोठी विकेट मिळाली आहे. रवी बिश्नोईने अवघ्या चार रन्सवर डेविड वॉर्नरला आयुष बदोनीकरवी झेलबाद केलं. दिल्लीच्या 8.3 ओव्हर्समध्ये दोन बाद 69 धावा झाल्या आहेत.
अर्धशतक झळकावल्यानंतर पृथ्वी शॉ आऊट झाला. 34 चेंडूत त्याने 61 धावा फटकावल्या. यात नऊ चौकार आणि दोन षटकार होते. फिरकी गोलंदाज कृष्णाप्पा गौतमने विकेटकिपर क्विंटन डि कॉक करवी पृथ्वीला झेलबाद केलं.
लखनौ विरुद्ध पृथ्वी शॉ ने अर्धशतक झळकावलं आहे. त्याने 30 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. पृथ्वीने 8 चौकार आणि एक षटकार लगावला. दिल्लीच्या सात षटकात बिनबाद 57 धावा झाल्या आहेत.
????-ndaar half-century Prithvi ?
Make it BIG ?#YehHaiNayiDilli #IPL2022 #LSGvDC
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 7, 2022
पावरप्लेमध्ये दिल्लीच्या बिनाबाद 52 धावा झाल्या आहेत. पृथ्वी शॉ 47 आणि वॉर्नर तीन धावांवर खेळतोय.
Kya powerplay tha ?
DC – 52/0 (6)#YehHaiNayiDilli #IPL2022 #LSGvDC
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 7, 2022
पृथ्वी शॉ फटकेबाजी करत आहे. दिल्लीला चांगली सुरुवात मिळाली आहे. चार षटकात दिल्लीच्या बिनबाद 40 धावा झाल्या आहेत. पृथ्वी शॉ 35 आणि वॉर्नर 3 धावांवर खेळतोय. पृथ्वी शॉ ने सहा चौकार आणि एक षटकार लगावला आहे.
Shaw hitting it to all corners of the park ?️
Just beautiful to watch! #YehHaiNayiDilli #IPL2022 #LSGvDC
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 7, 2022
जेसन होल्डरच्या दुसऱ्याषटकात पृथ्वी शॉ ने एका चौकार आणि एक षटकार लगावला. तीन षटकात दिल्लीच्या 27 बिनबाद धावा झाल्या आहेत.
Prithvi is not Holding back ?#YehHaiNayiDilli #IPL2022 #LSGvDC
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 7, 2022
दोन षटकात दिल्ली कॅपिटल्सच्या बिनाबाद 13 धावा झाल्या आहेत. पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नरची जोडी मैदानात आहे. कृष्णाप्पा गौतमच्या दुसऱ्या षटकात दोन चौकार लगावले.
केएल राहुल (कॅप्टन), क्विंटन डि कॉक, इविन लुइस, कृष्णप्पा गौतम, दीपक हुड्डा, आयुष बदोनी, कृणाल पंड्या, जेसन होल्डर, अँड्यू टाय, रवी बिश्नोई आणि आवेश खान,
ऋषभ पंत (कॅप्टन), पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर, सरफराज खान, रोव्हमॅन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, एनरिक नॉर्खिया आणि मुस्तफिजुर रहमान,
दिल्ली कॅपिटल्सच्या संघात आज तीन बदल करण्यात आले आहेत. सायफर्ट, मनदीप आणि खलील यांच्याजागी डेविड वॉर्नर, सर्फराज आणि नॉर्खिया यांचा समावेश करण्यात आला आहे.
Our changes for today ? Warner, Sarfaraz and Nortje come in for Seifert, Mandeep and Khaleel ?
How do you feel DC fans ?#YehHaiNayiDilli #IPL2022 #LSGvDC
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 7, 2022