LSG vs RCB IPL 2022: विराट कोहली Thank You, रजत पाटीदारकडून खास टि्वट

| Updated on: May 26, 2022 | 3:03 PM

LSG vs RCB IPL 2022: रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (Royal challengers Banglore) संघ हा स्टार खेळाडूंसाठी ओळखला जातो. विराट कोहली, (Virat kohli) फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल असे स्टार खेळाडू RCB कडून खेळतात.

LSG vs RCB IPL 2022: विराट कोहली Thank You, रजत पाटीदारकडून खास टि्वट
Rajat-virat
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (Royal challengers Banglore) संघ हा स्टार खेळाडूंसाठी ओळखला जातो. विराट कोहली, (Virat kohli) फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल असे स्टार खेळाडू RCB कडून खेळतात. कालच्या लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या एलिमिनेटरच्या सामन्यात या तीन खेळाडूंकडून भरपूर अपेक्षा होत्या. पण तिघांनी निराशा केली. विराट कोहली पुन्हा एकदा चांगल्या सुरुवातीनंतर 25 धावांवर आऊट झाला. फाफ डू प्लेसिस भोपळाही न फोडता तंबूत परतला, तर मॅक्सवेलने फक्त 9 धावा केल्या. अशावेळी रजत पाटीदार (Rajat Patidar) सारख्या अनकॅप्ड प्लेयरने सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली व क्रिकेट रसिकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील, अशी इनिंग खेळून गेला. रजत पाटीदारकडून अशा कामगिरीची कोणी अपेक्षा केली नव्हती. पण अनेक क्रिकेटपडिंतांना धक्का देत तो मोठी इनिंग खेळून गेला.

रजत पाटीदार हा RCB ची पहिली पसंती नव्हता

54 चेंडूत नाबाद 112 धावा ही रजत पाटीदारची मॅचविनिंग खेळी होती. त्याने लखनौ सुपर जायंट्सच्या सर्वच गोलंदाजांचा अक्षरक्ष: पालापाचोळा केला. महत्त्वाचं म्हणजे रजत पाटीदार हा RCB ची पहिली पसंती नव्हता. त्याला नशिबाने संधी मिळाली होती. निवडलेला खेळाडू स्पर्धेच्या पहिल्याच आठवड्यात दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्याजागी रजत पाटीदारचा संघात समावेश करण्यात आला. इतर खेळाडूंसाठी आरसीबीने कोट्यवधी रुपये मोजले. पण रजतला त्यांनी फक्त 20 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं.

विराटकडून विशेष कौतुक

“मी गेल्या काही वर्षात दबावाखाली अनेक परिणामकारक इनिंग्स बघितल्या आहेत. मोठ्या सामन्यात दबावाखाली आज मी जो खेळ पाहिला, तशी इनिंग याआधी पाहिली नव्हती. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा एका अनकॅप्ड खेळाडूने प्लेऑफमध्ये शतक झळकावलं” अशा शब्दात विराटने रजत पाटीदारचं कौतुक केलं. रजत पाटीदारने एक टि्वट केलय. त्यात त्याने विश्वास दाखवल्याबद्दल विराट कोहलीचे आभार मानले आहेत.

क्वालिफायरचा दुसरा सामना राजस्थानविरुद्ध

आरसीबी आता क्वालिफायरच्या दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळणार आहे. राजस्थानला गुजरात टायटन्सने पराभूत केलं होतं. RCB ने हा सामना जिंकला, तर ते फायनलमध्ये पोहोचतील.