Rohit Sharma IPL 2023 : कोहली, कोहलीच्या घोषणा, रोहितच नवीन उल हकला आक्रमक उत्तर, VIDEO व्हायरल

| Updated on: May 17, 2023 | 11:40 AM

LSG vs MI IPL 2023 : रोहितने नवीन उल हकला कडक उत्तर दिलं. जणू विराटचा बदला रोहितने घेतला. काल लखनऊच्या इकाना स्टेडियमवर हेच दिसलं. भविष्यातही नवीन उल हकला अशा प्रसंगाना सामोर जावं लागेल.

Rohit Sharma IPL 2023 : कोहली, कोहलीच्या घोषणा, रोहितच नवीन उल हकला आक्रमक उत्तर, VIDEO व्हायरल
Rohit sharma IPL 2023
Follow us on

लखनऊ : लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्समध्ये काल सामना झाला. या मॅचमध्ये लखनऊचा नवीन-उल-हक दोन आठवड्यानंतर मैदानावर दिसला. याआधी 1 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि लखनऊमध्ये झालेल्या मॅचच्यावेळी नवीन मैदानात दिसला होता. तो सामना जय-पराजयपेक्षा वादामुळे गाजला होता. नवीन उल हकच विराट कोहली बरोबर मैदानात वाजलं होतं. विराटने त्याला बूट सुद्धा दाखवला होता. काल मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यावेळी नवीन उल हकला लखनऊ टीममध्ये संधी देण्यात आली.

लखनऊचा कॅप्टन कृणाल पंड्याने काल नवीन उल हकला संधी दिली. नवीन चेंडू त्याच्या हाती सोपवला. पावरप्लेमध्ये नवीनने 2 ओव्हर गोलंदाजी केली. त्याने 16 धावा दिल्या.

रोहितच कडक उत्तर

नवीनच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये इशान किशनने त्याला चौकार तर, कॅप्टन रोहित शर्माने सिक्स मारला. या मॅचमध्ये एक वेगळ दृश्य पहायला मिळालं. नवीन उल हक गोलंदाजी करण्यासाठी आला, त्यावेळी स्टँडमधील प्रेक्षक कोहली, कोहलीच्या घोषणा देत होते. नवीन दुसरी ओव्हर टाकण्यासाठी आला, त्यावेळी सुद्धा प्रेक्षकांमध्ये कोहली-कोहलीच्या घोषणा थांबल्या नव्हत्या. त्याचवेळी रोहितने नवीनच्या स्लोअर चेंडूवर स्क्वेयर लेगला 65 मीटर लांब सिक्स मारला.


अशा प्रसंगाना सामोर जावं लागेल

विराट कोहली बरोबर झालेल्या वादामुळे नवीन उल हक भारतीय क्रिकेट रसिकांच्या चांगला लक्षात आहे. काल लखनऊच्या इकाना स्टेडियमवर हेच दिसलं. भविष्यातही नवीन उल हकला अशा प्रसंगाना सामोर जावं लागेल. मंगळवारी नवीन उल हकने 16 वी ओव्हर अप्रतिम टाकली. त्याने फक्त 6 धावा दिल्या.

टिम डेविडने चोपलं

पण 19 व्या ओव्हरमध्ये टिम डेविडने त्याला दोन सिक्स मारले व 19 धावा वसूल केल्या. मुंबईची टीम विजयाच्या समीप पोहोचली होती. पण मोहसीन खानने लास्ट ओव्हरमध्ये 11 धावांचा बचाव करुन मुंबई इंडियन्सला विजयापासून लांब ठेवलं. पॉइंट्स टेबलमध्ये LSG ची टीम आता तिसऱ्या नंबरवर आहे. नवीन उल हकला काल एकही विकेट काढता आला नाही.