Rahul Dravid : समित द्रविडचा थक्क करणारा शॉट, वडिल राहुल द्रविड यांच्यापेक्षा पूर्णपणे भिन्न क्रिकेटर, VIDEO

| Updated on: Aug 17, 2024 | 2:52 PM

Rahul Dravid : राहुल द्रविड आपल्या पूर्ण करियरमध्ये पारंपारिक अंदाजात क्रिकेट खेळले. जमिनीलगत, गॅप्स शोधून फटके मारले. पण त्यांचा मुलगा समित द्रविड पूर्णपणे वेगळा आहे. त्याने आक्रमक बॅटिंगची क्षमता दाखवून दिली आहे. बॅटिंग करताना त्याने मारलेल्या एका शॉटचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

Rahul Dravid : समित द्रविडचा थक्क करणारा शॉट, वडिल राहुल द्रविड यांच्यापेक्षा पूर्णपणे भिन्न क्रिकेटर, VIDEO
Samit Dravid
Follow us on

टीम इंडियाचे माजी हेड कोच राहुल द्रविड यांनी सध्या क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्यांचा कोच पदाचा कार्यकाळ संपला. राहुल द्रविड लवकरच कुठल्यातरी एका आयपीएल टीमचे कोच बनू शकतात असा अंदाज आहे. आता हे होणार की, नाही हे पुढच्या काही आठवड्यात समजेल. सध्या राहुल द्रविड मुलगा समितचा खेळ पाहत असतील, एवढ मात्र नक्की. राहुल द्रविड यांचा मुलगा सध्या एक देशांतर्गत T20 टुर्नामेंटमध्ये खेळतोय. या स्पर्धेत त्याने जास्त धावा केलेल्या नाहीत. पण त्याच्या एका शॉटने सगळ्यांना हैराण केलय. हा असा शॉट आहे, जो त्याचे पिता राहुल द्रविड यांच्या खेळण्याच्या स्टाइलपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे.

कर्नाटक क्रिकेट असोशिएशनने T20 टुर्नामेंट महाराजा कप भरवलाय. समित द्रविड या स्पर्धेत खेळतोय. तो मैसूर वॉरियर्स टीमकडून खेळतोय. त्याच्यासाठी ही स्पर्धा अजूनपर्यंत फार चांगली ठरलेली नाही. पण एक शॉट मारुन त्याने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं. हा असा फटका होता, ज्यात सध्याच्या क्रिकेटचा बिनधास्तपणा होता. पारंपारिक क्रिकेटची स्टाईल होती. सोशल मीडियावर समित द्रविडचा हा फटका हिट झालाय.

मंद गतीने सुरुवात

18 वर्षाच्या समित द्रविडने बंगळुरु ब्लास्टर्स विरुद्ध हा शॉट मारला. शुक्रवारी 16 ऑगस्टला बंगळुरुमध्ये मॅच झाली. मैसूरने पहिली बॅटिंग केली. चौथ्या नंबरवर बॅटिंगला आलेल्या समितने मंद गतीने सुरुवात केली. 5 चेंडूत त्याने फक्त 1 धावा केली. त्यात तीन निर्धाव चेंडू होते. त्यानंतर समितने गेअर बदलला. गणेश्वर नवीनच्या चेंडूवर त्याने हवेत उंच फटका मारला. चेंडू थेट बाऊंड्री लाइनबाहेर स्टेडियमच्या स्टँडमध्ये जाऊन पडला.

वडिलांपेक्षा वेगळे आहोत, हे त्याने दाखवून दिलं

समितच्या या शॉटने क्रिकेट चाहत्यांना हैराण केलं. कारण सगळ्यांच्या डोक्यात त्याचा खेळ पाहताना राहुल द्रविड यांची प्रतिमा असते. राहुल द्रविड तंत्रशुद्ध फलंदाज होते. ते जमिनीलगत फटके मारुन चौकार वसूल करायचे. सगळ्यांना असंच वाटेल की, समित वडिलांसारखा खेळतो पण असं नाहीय. आपण वडिलांपेक्षा वेगळे आहोत, हे त्याने दाखवून दिलय.


एका फटक्यामध्ये त्याचं टॅलेंट दिसलं

आजच्या क्रिकेटच्या हिशोबाने तो मोठे फटके खेळतो. तो मोठी इनिंग खेळू शकला नाही. फक्त 7 रन्स काढून आऊट झाला. पण एका फटक्यामध्ये त्याचं टॅलेंट दिसून आला. मागच्या सामन्यातही तो 7 धावांवरच आऊट झाला होता.