पुणे : महाराष्ट्र प्रीमियर लीगचा पहिला सीजन कालपासून सुरु झालाय. पुणेरी बाप्पा विरुद्ध कोल्हापूर टस्कर्समध्ये गुरुवारी पहिला सामना पार पडला. सलामीच्या सामन्यात ऋतुराज गायकवाड याच्या पुणेरी बाप्पाने कोल्हापूर टस्कर्सवर 8 विकेट्स विजय मिळवला. केदार जाधव कोल्हापूर टस्कर्सचा कॅप्टन आहे. MPL 2023 चा हा पहिला सीजन आहे. पहिल्या सीजनमध्ये एकूण सहा टीम्स आहेत.
लीग स्टेजमध्ये एकूण 19 सामने खेळले जाणार आहेत. राऊंड रॉबिन पद्धतीने या सर्व मॅच होतील. आयपीएलमध्ये नाव कमावणारे ऋतुराज गायकवाड, केदार जाधव, राहुल त्रिपाठी आणि राज्यवर्धन हंगरगेकर असे मोठे खेळाडू या लीगमध्ये खेळतील.
MPL 2023 बद्दल सर्वकाही जाणून घ्या.
महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धा कधी सुरु होणार?
महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धा 15 जूनपासून सुरु झालीय. 29 जूनला स्पर्धेची फायनल होईल.
किती सामने होणार?
प्लेऑफसह महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये एकूण 19 सामने होतील.
किती टीम MPL 2023 मध्ये खेळणार आहेत?
छत्रपती संभाजी किंग्स, इगल नाशिक टायटन्स, कोल्हापूर टस्कर्स, पुणेरी बाप्पा, रत्नागिरी जेट्स आणि सोलापूर रॉयल्स या सहा टीम्स ट्रॉफीसाठी MPL 2023 मध्ये भिडणार आहेत.
MPL 2023 मध्ये मॅचचा टायमिंग काय आहे?
दुपारचे सामने 2 वाजता आणि संध्याकाळचे सामने रात्री 8 वाजता सुरु होतील.
Live streaming
फॅनकोड APP आणि वेबसाइटवर या सामन्यात लाइव्ह स्ट्रीमिंग होईल.
टीव्हीवर DD Sports वर हे सामने पाहता येतील.
⭐️⭐️⭐️⭐️⭐️ Our rating for @Ruutu1331
Also, the number of 6️⃣s he hit tonight!
..#MPLonFanCode pic.twitter.com/SA1h1h6VdT
— FanCode (@FanCode) June 15, 2023
आज शुक्रवारी कोणते सामने होणार?
इगल नाशिक टायटन्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स दुपारी 2 वाजता.
रत्नागिरी जेट्स विरुद्ध सोलापूर रॉयल्स रात्री 8 वाजता.