मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्थात बीसीसीआयने जुलै महिन्यात होणार्या श्रीलंका दौर्यासाठी भारतीय संघ जाहीर केला आहे (Indian Squad For Sri Lanka Tour). काही सिनियर, काही तरुण आणि अनेक नवीन चेहरे असलेल्या या संघाची धुरा अनुभवी सलामीवीर शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) हाती देण्यात आली आहे. या संघात मराठमोळे खेळाडू पुणेकर ऋतुराज गायकवाड (RutuRaj Gaikwad) आणि मुंबईकर पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) यांची निवड करण्यात आलेली आहे. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर या दोन्ही खेळाडूंची संघात निवड करण्यात आली आहे. ऋतुराजने चेन्नईकडून खेळताना आपल्या बॅटिंगची प्रतिभा आणि क्षमता दाखवून दिली तर पृथ्वीने दिल्लीकडून खेळताना सेहवागनंतरचा ओपनर फलंदाज कसा असावा, याचं प्रात्याक्षिक त्याने खेळलेल्या आयपीएलच्या प्रत्येक सामन्यात दाखवून दिलं. क्षीलंका दौऱ्यात या खेळाडूंवर आता मोठी जबाबदारी असेल. (Maharashtrian Player RutuRaj Gaikwad And Prithvi Shaw Selected Indian Squad For Sri Lanka Tour)
विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांसारख्या नियमित सदस्यांशिवाय भारतीय संघ श्रीलंका दोऱ्यावर जात आहे. शिखर धवन पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व करणार आहेत. याआधी त्याने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व केलं आहे. आता प्रथमच आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याच्याकडे भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे. दुसरीकडे जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) संघाचा उपकर्णधार म्हणून नेमण्यात आले आहे.
ऋतुराज गायकवाड…. मराठमोळ्या ऋतुराजने आयपीएलच्या मोसमात आपल्या बॅटची जादू क्रिकेट रसिकांना दाखवून दिलीय. ऋतुराजने आयपीएलच्या 13 व्या मोसमात सलग 3 अर्धशतक ठोकत आपल्यातील क्षमता दाखवून दिली होती. ऋतुराजने या 14 व्या मोसमातील 7 सामन्यात 2 अर्धशतकांसह 25 चौकार आणि 5 सिक्सच्या मदतीने 196 धावा केल्या. चेन्नईचा आक्रमक ओपनर बॅट्समन म्हणून त्याची ओळख आहे. धोनीचा आणि संघ व्यवस्थापनाचा त्याच्यावर विश्वास आहे. म्हणून तर आय़पीएलच्या 14 व्या मोसमातील सुरुवातीच्या दोन-तीन सामन्यात अपयश येऊन देखील संघ व्यवस्थापनाने आणि कर्णधार धोनीने त्याला खेळण्याची संधी दिली आणि त्यानेही पुढच्या तीन मॅचेसमध्ये दोन अर्धशतकं ठोकत धोनीचा आणि संघाचा विश्वास सार्थ ठरवला.
मुंबईकर पृथ्वी शॉने मुंबई क्रिकेटमध्ये अनेक विक्रम रचले. त्याला जशीही आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली त्याने तिथंही आपलं कर्तृत्व सिद्ध केलं. आयपीएलच्या 14 व्या मोसमात तर त्याने कमाल केली. दिल्लीकडून खेळताना पृथ्वीने दाखवून दिलं की सेहवागनंतरचा ओपनर फलंदाज कसा असावा… त्याने सुरुवातीच्या ओव्हरमध्ये प्रतिस्पर्धी गोलंदाजांची झोप उडवली. चौकार आणि षटकारांची लयलूट केली. त्याच्या या कामगिरीने अनेक दिग्गज त्याच्यावर भाळले. अनेकांनी त्याला उद्याच्या भारतीय क्रिकेटचं भविष्य म्हटलं.
भारतीय संघाचा आता मराठमोळ्या ऋतुराज आणि पृथ्वीवर मोठी जबाबदारी असणार आहे. अनेक सिनिअर खेळाडू संघात उपस्थित नसताना श्रीलंका दौऱ्यात या दोन खेळाडूंना आपल्या बॅटिंगने भारतीय संघाला विजय मिळवून देण्यासाठी कष्ट घ्यावे लागतील. तसंच मिळालेल्या संधीची फायदाही उठवावा लागेल.
टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यात तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे. हे सर्व सामने कोलंबोमधील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत.
(Maharashtrian Player RutuRaj Gaikwad And Prithvi Shaw Selected Indian Squad For Sri Lanka Tour)
हे ही वाचा :
IND vs SL : श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, कर्णधारपद कोणाकडे?