मुंबई: क्रिकेट (Cricket) आणि बेसबॉल (Baseball) या दोन खेळांमध्ये फलंदाजाने लांबलचक फटकावलेले चेंडू स्टँडसमध्ये बसलेले प्रेक्षक झेलण्याचा प्रयत्न करतात. सध्या सुरु असलेल्या आयपीएलच्या (IPL) सीजनमध्ये हे दृश्य अनेकदा बघायला मिळालय. फलंदाजाने मारलेला षटकाराची स्टँडमध्ये बसलेल्या प्रेक्षकांनी कॅच घेतलीय किंवा त्यांना तो लागलाय. मागच्या आठड्यात असाच एक षटकार लागल्याने आजोबा घायाळ झाले होते. एका बेसबॉल मॅचमध्ये, तर एकदम विचित्र प्रकार घडला होता. स्टँडमध्ये बसलेल्या प्रेक्षकाला कॅच, तर घेता आला नाहीच. पण त्याने शेजारी बसलेल्या महिलेला मात्र नाहक मनस्ताप दिला. असं दृश्य तर खूप कमी पहायला मिळतं.
कॅलिफोर्नियाच्या ओकलँडमध्ये क्लेव्हलँड गार्डीयन्स आणि ओकलँड ए दरम्यानच्या सामन्या दरम्यान ही घटना घडली होती. बेसबॉलपटूने लांबलचक मारलेला फटका झेलण्याच्या प्रयत्नात त्या माणसाने हातातली बिअर शेजारी बसलेल्या महिलेच्या अंगावर सांडली होती. परदेशात स्टेडियममध्ये प्रेक्षकांना बिअर नेण्याची परवानगी असते. अनेकदा स्टेडियममधील मोकळ्या स्टँडमध्ये किंवा मोकळ्या जागेत प्रेक्षकांच्या हातात बिअरचे ग्लास दिसतात.
या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हातात बिअरचा ग्लास पकडून हा माणूस कॅच पकडण्याचा प्रयत्न करत होता. शेजारी बसलेल्या महिलेच्या हातात खाद्यपदार्थही होते. ही बिअर तिच्या चेहऱ्यावर आणि खाद्य पदार्थावर सांडली होती. त्या माणसाची चूक होती. पण महिला त्याच्यावर नाराज दिसली नाही. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.