U19 World Cup : एकही सामना न खेळता दोन खेळाडू बनले वर्ल्ड चॅम्पियन, कोरोनाने हिरावली मोठी संधी

| Updated on: Feb 06, 2022 | 11:56 AM

भारतीय संघ साखळी फेरीत दोन सामने खेळला पण त्यानंतर संघाला कोरोनाचा फटका बसला. टीमच्या सहा खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर टीम इंडियाला कसेबसे 11 खेळाडू मैदानात उतरवता आले.

U19 World Cup : एकही सामना न खेळता दोन खेळाडू बनले वर्ल्ड चॅम्पियन, कोरोनाने हिरावली मोठी संधी
IND U19 Team
Follow us on

मुंबई : भारताच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघाने (U19 Team India) रविवारी 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकाच्या (U19 World Cup) अंतिम सामन्यात इंग्लंडचा पराभव करून विजेतेपद पटकावले. टीम इंडियाने पाचव्यांदा वर्ल्ड कप जिंकला आहे. या स्पर्धेत संघाला प्रतिस्पर्ध्यांसह कोरोनाचाही (Covid-19) सामना करावा लागला. एक काळ असा होता की संघाकडे सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन निवडण्यासाठीसुद्धा खेळाडू नव्हते. असे असूनही टीम इंडिया संपूर्ण स्पर्धेत अजिंक्य राहिली. तसेच संघात असे दोन खेळाडू होते ज्यांना कोरोनामुळे संपूर्ण स्पर्धेत एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

भारतीय संघ साखळी फेरीत दोन सामने खेळला पण त्यानंतर संघाला कोरोनाचा फटका बसला. टीमच्या सहा खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर टीम इंडियाला कसेबसे 11 खेळाडू मैदानात उतरवता आले. कोरोनामुळे संघाचे दोन खेळाडू स्पर्धेतील एकही सामना खेळू शकले नाहीत आणि संपूर्ण वेळ बेंचवरच राहिले.

दोन खेळाडूंना एकही सामना खेळता आला नाही

कर्णधार यश धुल, उपकर्णधार शेख रशीद, मानव पारख, सिद्धार्थ यादव, वासू वत्स आणि आराध्य यादव यांना करोनाचा फटका बसला. मात्र उपांत्य फेरीपूर्वी सर्वजण कोरोनामधून बरे झाले होते. यश धुल, शेख रशीद, वासू वत्स आणि सिद्धार्थ यादव यांना पुनरागमनाची संधी मिळाली पण आराध्य यादव आणि मानव पारख संपूर्ण स्पर्धेत बेंचवर राहिले. खेळाडूंना कोरोनाची लागण होण्यापूर्वी खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये त्यांना संधी मिळाली नव्हती.

या खेळाडूंना संधी मिळाली नाही

यापूर्वी 2018 मध्ये पंकज यादव आणि श्री वामसी यांना एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यावर्षी टीम इंडिया चॅम्पियन झाली. तर 2016 मध्ये अमनदीप खरे, 2012 मध्ये रुश कलारिया आणि संदिपन दास एकही सामना खेळू शकले नव्हते. 2008 मध्ये अभिनव मुकुंद, पेरी गोयल आणि डी शिवा कुमार यांना संपूर्ण विश्वचषक खेळण्याची संधी मिळाली नव्हती. फैज फजल, हार्डी संधू आणि निखिल राठोड हे त्या खेळाडूंमध्ये होते जे 2004 च्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये खेळू शकले नव्हते. 2002 मध्ये, खानिन सैकिया 19 वर्षाखालील विश्वचषक संघाचा भाग असूनही खेळू शकला नाही.

पाचवं जेतेपद

मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली भारताने 2000 मध्ये पहिल्यांदा जेतेपदावर कब्जा केला होता. त्यानंतर 2008 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाला दुसरे विजेतेपद पटकावण्यात यश आले होते. भारताने 2012 मध्ये उन्मुक्त चंद आणि 2018 मध्ये पृथ्वी शॉ यांच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर यंदा यश धुलच्या नेतृत्वाखाली भारताने वर्ल्डकप जिंकला.

इतर बातम्या

ICC U19 World Cup : संपूर्ण स्पर्धेत भारतीय गोलंदाजांचा दबदबा, प्रत्येक संघ 200 धावांच्या आत गुंडाळला

Raj Bawa : राज बावाच्या तुफानी स्पेलनं इग्लंडचं कंबरडं मोडलं, पाकिस्तानच्या खेळाडूच्या रेकॉर्डलाही मागं टाकलं

Raj Bawa Ravi Kumar : राज बावा रविकुमार यांच्या जोडीनं विजयाचा पाया रचला, निशांत सिंधूनं कळस चढवला