मुंबई: मनमाडची आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिर (Wet lifter) आकांक्षा किशोर व्यवहारे (Akanksha Vyvahare ) हिने उझबेकिंस्थानच्या (uzbekistan) ताशकंद येथे सुरू असलेल्या आशियाई युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं. 40 किलो वजनी गटात तिने 55 किलो स्नॅच 70 किलो क्लिन जर्क असे 125 किलो वजन उचलून कांस्यपदक पटकावलं.
मनमाडची पताका साता समुद्रापलीकडे फडकविल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मेक्सिको येथील जागतिक स्पर्धेत रौप्यपदक पटकविल्याने आशियाई युथ स्पर्धेत आकांक्षा कडून पदकाची अपेक्षा होती.
सलग दुसऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक पटकवीत मनमाड, महाराष्ट्र व भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे आकांक्षा सोबत भारतीय संघा बरोबर गेलेल्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर व छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांचे आकांक्षाला मार्गदर्शन लाभले आहे.