डरबन: तू एक मारशील, तर मी तुला दोन मारीन, असं वाक्य काहीवेळा आपल्या कानावर ऐकू येतं. दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या T20 लीगमध्ये असच काहीस पहायला मिळालं. या लीगमध्ये 267 दिवसापूर्वीचा हिशोब चुकता झाला. तुम्ही म्हणाल, आताच SA20 लीग सुरु झालीय. पहिलाच सीजन सुरु आहे, मग 267 दिवसांपूर्वीचा हिशोब चुकता केला, असं तुम्ही कसं म्हणू शकता? SA20 लीगमद्ये मार्को जॅनसेनने बदला घेतला. IPL 2022 मध्ये या सगळ्याची सुरुवात झाली होती. राशिद खान विरोधात हिशोब चुकता केल्यानंतर मार्को जॅनसेनच्या मनाला आता कुठे शांती मिळाली असेल.
जॅनसेन विजयाचा नायक
SA20 मध्ये 18 जानेवारी मुंबई इंडियन्स केपटाऊन आणि सनरायजर्स ईस्टर्न कॅपमध्ये सामना झाला. या मॅचमध्ये बदल्याचा हा खेळ पहायला मिळाला. सनरायजर्स ईस्टर्न कॅपने ही मॅच जिंकली. या मॅचमध्ये मार्को जॅनसेनने हिशोब चुकता केला, त्याची सर्वात जास्त चर्चा आहे. मार्को जॅनसेन सनरायजर्सच्या विजयाचा नायक ठरला.
27 चेंडूत ठोकल्या 66 रन्स
मुंबई इंडियन्स केपटाऊनने या मॅचमध्ये पहिली बॅटिंग केली. 20 ओव्हर्समध्ये मुंबई इंडियन्सने 6 विकेट गमावून 171 धावा केल्या. सनरायजर्स ईस्टर्न कॅपसमोर विजयासाठी 172 धावांच टार्गेट होतं. सनरायजर्सने 3 चेंडू राखून हे लक्ष्य गाठलं. मार्को जॅनसेनच्या वादळी खेळीमुळे सनरायजर्सला हे लक्ष्य पार करता आलं. मुंबई इंडियन्स केपटाऊनचा बॉलर राशिद खानवर त्याने हल्लाबोल केला.
मॉर्को जॅनसेनने 27 चेंडूत फक्त 66 धावाच फटकावल्या नाहीत, तर त्याने 3 चौकार आणि 7 षटकार मारले. 244.44 च्या स्ट्राइक रेटने त्याने बॅटिंग केली.
Some clean hitting by Marco Jansen as he smashes 2⃣8⃣ runs off the Rashid over ?#Betway #SA20 #MICTvSEC | @Betway_India pic.twitter.com/504jSzfqXf
— Betway SA20 (@SA20_League) January 18, 2023
राशिद खानला धुतलं
मार्को जॅनसेनने 7 पैकी 4 सिक्स फक्त एका ओव्हरमध्ये मारले. 3 पैकी एक चौकारही याच ओव्हरमध्ये मारला. 66 पैकी 28 धावा याच ओव्हरमध्ये आल्या. महत्त्वाच म्हणजे राशिद खानच्या ओव्हरमध्ये या सगळ्या धावा आल्या. सनरायजर्स ईस्टर्न कॅपच्या इनिंगची ती 16 वी ओव्हर होती.
267 दिवसानंतर घेतला बदला
27 एप्रिल 2022 रोजी आयपीएल सामना झाला. राशिद खान गुजरात टायटन्सकडून खेळत होता. राशिद खानने या मॅचमध्ये SRH विरुद्ध जबरदस्त बॅटिंग केली होती. याच सामन्यात मार्को जॅनसेनच्या एका ओव्हरमध्ये राशिद खानने 25 धावा कुटल्या होत्या. गुजरात टायटन्सच्या इनिंगमधील ती शेवटची 20 वी ओव्हर होती. राशिदने या ओव्हरमध्ये 4 सिक्स आणि एक चौकार मारला होता.