T20 World Cup 2021: टी विश्वचषका स्पर्धेत (T20 World Cup 2021) कमालीच्या फॉर्ममध्ये असलेल्या पाकिस्तानला नमवत ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये झेप घेतली आहे. ऑसीसीनी सेमीफायनलच्या सामन्यात 5 विकेट्सनी पाकिस्तानला पराभूत केलं आहे. पण या सामन्याचे खरे हिरो ठरले आहेत ऑस्ट्रेलियाचे फलंदाज मार्कस स्टॉयनिस आणि मॅथ्यू वेड. या दोघांनी नाबाद अर्धशतकी खेळी करत संघाचा विजय पक्का केला. मॅथ्यूने तर 19 व्या षटकात लागोपाठ 3 षटकार ठोकत संघाचा विजय सोपा केला. आता ऑस्ट्रेलियाचा सामना रविवारी (14 नोव्हेंबर) न्यूझीलंडशी (New zealand vs Australia) होणार आहे.
दरम्यान सेमीफायनलसारख्या महत्त्वाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ अडचणीत सापडला असताना मॅथ्यू आणि मार्कसने संघाला तारलं. विशेष म्हणजे यंदाच्या विश्वचषकात असं दुसऱ्यांदा झालं आहे. सर्वात पहिल्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयासाठा काही धावांची गरज असताना या दोघांनी नाबाद खेळी केली होती. त्यावेळी मार्कसने नाबाद 24 तर मॅथ्यूने नाबाद 15 धावा केल्या होत्या. ज्यानंतर पाकविरुद्धच्या सेमीफायनलसामन्यात तर मार्कसने नाबाद 40 तर मॅथ्यूने नाबाद 41 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे दोन्ही वेळी ऑस्ट्रेलियाने 5 विकेट्सनीच विजय मिळवला आहे.
सेमीफायनलच्या पाक विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात 19 व्या षटकात मॅथ्यूच्या तुफान सिक्सेसमुळे पाकला सामना पाकला गमवावा लागला. पण याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर पाकिस्तानच्या हसन अलीने मॅथ्यूचा एक झेल देखील सोडला. जो सामन्यात टर्निंग पॉईंट ठरला. कारण ती कॅच घेतली असती तर पुढील षटकार मॅथ्यू मारु शकला नसता आणि पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला नसता. मात्र माझा झेल जरी घेतला असता तरी आम्ही तेव्हा मजबूत स्थितीमध्ये होतो. जिंकण्याचा पूर्ण आत्मविश्वास होता. त्यामुळे आम्हाला फारसा फरक पडला नसता आम्हीच जिंकलो असतो अशी प्रतिक्रिया मॅथ्यूने दिली आहे.
इतर बातम्या
T20 World Cup 2021: ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहम्मद रिजवानचं अर्धशतक, 1000 धावा करत रचला इतिहास
IND vs NZ : भारतीय कसोटी संघात नवा मुंबईकर, न्यूझीलंडविरुद्ध करणार पदार्पण
(Marcus and mathew helps australia from starting of the session first against south africa now against pakistan)