लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघात दुखापतींची मालिका सुरुच आहे. सर्वात आधी शुभमन गिल त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान यांच्या दुखापतग्रस्त झाल्याने भारताने भारतातून फलंदाज सूर्यकुमार यादव (Surya Kumar Yadav) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) यांना इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी बोलावून घेतलं. दोघांचीही कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असून ते लवकरच इंग्लंडसाठी रवाना होणार आहेत. पण त्यापूर्वीच भारतीय संघातील सलामीवीर मयांक अगरवाल (Mayank Agarwal) सरावादरम्यान दुखापतग्रस्त झाला आहे. मयांकच्या हॅल्मेटला अत्यंत जोरात चेंडू लागला ज्यामुळे त्याला विश्रांती देण्याकरता पहिला सामना संघाबाहेर ठेवण्यात येणार आहे.
शुभमन दुखापतग्रस्त झाल्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी मयांक सर्वात बेस्ट ऑप्शन होता. पण आता तोच पहिल्या सामन्यात नसल्यामुळे भारतीय संघाला नवा सलामीवीर म्हणून कोणालातरी संधी द्यावी लागणार आहे. मयांकच्या दुखापतीबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ट्विट करत माहिती दिली आहे.
NEWS ?- Mayank Agarwal ruled out of first Test due to concussion.
The 30-year-old is stable and will remain under close medical observation.
More details here – https://t.co/6B5ESUusRO #ENGvIND pic.twitter.com/UgOeHt2VQQ
— BCCI (@BCCI) August 2, 2021
शुभमनच्या जागी सलामीसाठी सर्वात पहिला पर्याय म्हणजे मयांक अगरवाल असण्यामागे कारण त्याचा याआधीच्या इंग्लंड दौऱ्यातील धमाकेदार फॉर्म आहे. इंग्लंड विरोधात सलामीला उतरत त्याने इंग्लंडच्या मैदानावर चांगली खेळी केली आहे. त्याने भारतीय संघाकडून आतापर्यंत 14 टेस्टमध्ये 45.73 च्या सरासरीने 1 हजार 52 धावा केल्या आहेत. ज्यात तीन शतकांसह चार अर्धशतकांचा समावेश आहे.
भारतीय संघाकडे सध्या अनेक उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू असल्याने दुखापतीनंतरही संघावर मोठं संकट येत नाहीये. त्यामुळे मयांकसाठीही संघाकडे दोन उत्तम पर्याय आहेत. ज्यात पहिला पर्याय त्याचाच साथीदार केएल राहुल (KL Rahul) तर दुसरा पर्याय हनुमा विहारी (Hanuma Vihari) आहे. दोघांनी आतापर्यंत काही चांगल्या खेळींच्या जोरावर संघात पुन्हा स्थान मिळवले आहे. राहुलने काउंटी 11 विरुद्धच्या सराव सामन्यात शतक ठोकल्याने त्याची खेळण्याची शक्यता अधिक आहे.
पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट
दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट
तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट
चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर
पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.
हे ही वाचा
IND vs ENG : भारताविरुद्ध मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, चार दिग्गज खेळाडूंचे पुनरागमन
IND vs ENG : भारताचा नवखा गोलंदाज, 74 धावा देत 7 विकेट, 24 वर्षांनंतर लॉर्ड्सवर विजय
(Mayank Agarwal ruled out of first Test due to concussion india need new opener for england test series first match)