लंडन : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात होण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असताना, टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा सलामीवीर मयांक अग्रवालला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे मयांक अग्रवाल पहिल्या कसोटीतून बाहेर पडला आहे. नेट्समध्ये सरावादरम्यान मोहम्मद सिराजने टाकलेला चेंडू मयांक अग्रवालच्या हेल्मेटवर वेगवान चेंडू आदळला. त्यामुळे मयांक अग्रवालच्या डोक्याला दुखापत झाली आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड अर्थात BCCI ने याबाबतची माहिती दिली. (Mayank Agarwal ruled out of first Test India vs England test series he was hit on the helmet while batting during nets session )
सरावादरम्यान दुखापत
भारतीय क्रिकेट टीम सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. यापैकी पहिला सामना 4 ऑगस्टपासून नॉटिंगहॅम इथे खेळला जाणार आहे. या सामन्याआधी सरावादरम्यान मयांक अग्रवालच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. गोलंदाज मोहम्मद सिराजने नेटमध्ये फेकलेला चेंडू त्याच्या हेल्मेटवर लागला आणि मयांक जखमी झाला आहे. त्याला भारतीय टीमच्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.
NEWS ?- Mayank Agarwal ruled out of first Test due to concussion.
The 30-year-old is stable and will remain under close medical observation.
More details here – https://t.co/6B5ESUusRO #ENGvIND pic.twitter.com/UgOeHt2VQQ
— BCCI (@BCCI) August 2, 2021
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मयांक अग्रवालबाबत एक प्रेसनोट जाहीर केली आहे. यामध्ये मयांकला दुखापत झाल्याचं सांगण्यात आलं आहे. मयांकची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू असल्याची माहिती जय शाह यांनी दिली आहे.
भारत आणि इंग्लंडदरम्यान 4 ऑगस्टपासून कसोटी सिरीजला सुरूवात होत आहे. त्याआधी भारतीय फलंदाज शुभमन गिल, ऑलराऊंडर वॉशिग्टन सुंदर आणि वेगवान गोलंदाज आवेश खान दुखापतीमुळे आधीच संघाच्या बाहेर आहेत. त्यात मयांग अग्रवालही दुखापतग्रस्त झाल्याने भारतीय टीमपुढच्या समस्या वाढल्या आहेत.
इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघात सामिल होण्यासाठी फलंदाज सूर्यकुमार यादव (Surya Kumar Yadav) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) पूर्णपणे फिट झाले आहेत. दोघेही श्रीलंका दौऱ्यावर असताना त्याठिकाणी संघात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे दोघांच्या इंग्लंडला जाण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. मात्र आता दोन्ही खेळाडूंच्या तीन कोविड-19 चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे पुढील 24 तासांत दोघेही इंग्लंडसाठी रवाना होणार आहेत. भारतीय संघातील काही खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने शॉ आणि यादवला इंग्लंडला पाठवण्यात येणार आहे.
पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट
दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट
तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट
चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर
पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल (दुखापतीमुळे बाहेर), मयंक अगरवाल (दुखापतीमुळे बाहेर), चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर (दुखापतीमुळे बाहेर), जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव. केएल राहुल आणि वृद्धिमान साहा
राखीव खेळाडू : अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान ((दुखापतीमुळे बाहेर)) आणि अर्जान नाग्वासवाला.
संबंधित बातम्या
IND vs ENG : भारताविरुद्ध मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, चार दिग्गज खेळाडूंचे पुनरागमन