RCB vs LSG : मयंक यादवचा कसला भन्नाट पेस, ग्रीनला बॉल कळला नाही की, दिसला नाही, Video

| Updated on: Apr 03, 2024 | 9:46 AM

IPL 2024 : मयंक यादवने सलग दुसऱ्या सामन्यात आपल्या वेगाचा जलवा दाखवला. या वेगवान गोलंदाजाने आरसीबी विरुद्ध 15 धावा देऊन 3 विकेट काढल्या. तो प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला. मयंक यादवने कमीलीची गोलंदाजी केली. त्याच्या एका चेंडूने आरसीबीच्या फलंदाजांच्या मनात दहशत निर्माण केली.

RCB vs LSG : मयंक यादवचा कसला भन्नाट पेस, ग्रीनला बॉल कळला नाही की, दिसला नाही, Video
RCB vs LSG
Image Credit source: PTI
Follow us on

पेस इज पेस यार…पाकिस्तानमध्ये हा डायलॉग खूप प्रसिद्ध आहे. पाकिस्तानी क्रिकेटर्स, तिथले पत्रकार अनेकदा आपल्या वेगवान गोलंदाजांबद्दल हा डायलॉग वापरतात. आता ‘पेस इज पेस यार’ हा डायलॉग भारतातल्या एका वेगवान गोलंदाजाला लागू होतोय. सध्या मयंक यादव या गोलंदाजाने IPL 2024 मध्ये आपल्या गोलंदाजीने दहशत निर्माण केलीय. पंजाब किंग्स विरुद्ध 3 विकेट घेणाऱ्या मयंक यादवने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमला दणका दिला आहे. लखनऊ सुपर जायंट्सच्या या वेगवान गोलंदाजाने आपल्या भन्नाट वेगाच्या बळावर बंगळुरु विरुद्ध 15 धावा देऊन 3 विकेट घेतलेत. मयंक यादवचा प्रत्येक चेंडू कमालीची होता. पण या गोलंदाजाने आपल्या एका चेंडूने आरसीबीच्या फलंदाजांमध्ये दहशत निर्माण केली.

मयंक यादवने आरसीबी विरुद्ध तीन विकेट घेतले. त्याने ग्लेन मॅक्सवेलला शॉर्ट बॉलवर आऊट केलं. रजत पाटीदार सुद्धा शॉर्ट चेंडूवर आऊट झाला. पण सर्वात उत्तम विकेट कॅमरुन ग्रीनचा होता. कॅमरुन ग्रीनला मयंक यादवने 8 व्या ओव्हरमध्ये आऊट केलं. मयंक यादवने ग्रीनला ज्या चेंडूवर बोल्ड केलं, तो खूप खास होता. चेंडू इतका वेगात आला की, कॅमरुन ग्रीनचा फ्रंट फूट पूर्ण बाहेर येण्याआधीच चेंडूने ऑफ स्टम्प उडवला. ग्रीन ज्या चेंडूवर बोल्ड झाला, त्याआधी मयंक यादवने आपल्या पेसने त्याला बीट केलं होतं. मयंक यादवने या ओव्हरमध्ये 156.7 किमी प्रति तास वेगाने चेंडू टाकला. या सीजनमधील हा सर्वात वेगवान चेंडू आहे. मयंकने आपलाच रेकॉर्ड मोडला. या गोलंदाजाने मागच्या मॅचमध्ये 155.8 किमी प्रति तास वेगाने चेंडू टाकला होता.


नवीन खेळाडू दोन्ही सामन्यात प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी

ग्लेन मॅक्सवेल हा ऑस्ट्रेलियात लहानपणापासून वेग आणि उसळी असलेल्या खेळपट्ट्यांवर खेळतोय. पण मयंक यादवच्या पेसने तो सुद्धा बीट झाला. तो चेंडू कमालीचा होता. मयंकच्या चेंडूवर मॅक्सवेलने पुल मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याने खूप उशीर केला. चेंडू मिड ऑनला उभ्या असलेल्या निकोलस पूरनच्या हातात गेला. मयंक यादव या सीजनमध्ये आतापर्यंत 2 सामने खेळलाय. 6 विकेट त्याने घेतल्या आहेत. दोन्ही सामन्यात हा खेळाडू प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला.