मुंबई: आयपीएल मधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्स फ्रेंचायजीने आणखी 2 नवीन संघ लाँच केले आहेत. हे दोन्ही नवीन संघ UAE आणि दक्षिण आफ्रिकेतील लीग मध्ये आपल्या लौकीकाला साजेसा खेळ दाखवतील. आयपीएल मध्ये सर्वाधिक 5 वेळा जेतेपद मुंबई इंडियन्सच्या संघाने पटकावलं आहे. मुंबई फ्रेंचायजीची मालकी रिलायन्स इंडस्ट्रीजकडे आहे. मुंबई इंडियन्सने आता यूएई आणि दक्षिण आफ्रिका टी 20 लीग मध्ये मुंबई अमीरात आणि मुंबई केपटाऊन नावाने 2 नवीन संघ लाँच केले आहेत.
मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर केलाय. यात दोन्ही संघांच्या नावांची घोषणा केली आहे. दोन्ही संघांची जर्सी कशी असेल? त्याची सुद्धा माहिती दिलीय. अमीरात आणि केपटाऊन दोन्ही संघ मुंबई इंडियन्स कुटुंबाचा भाग आहेत.
दोन्ही संघांची जर्सी मुंबई इंडियन्सशी मिळती-जुळती असेल. म्हणजेच दोन्ही टीम्सच्या जर्सी मध्ये ब्लू आणि गोल्डन रंग पहायला मिळेल. अमीरात आणि केपटाउन टीमचं नाव तिथली विशिष्ट शहर लक्षात घेऊन ठेवण्यात आलं आहे. आयपीएल मधील प्रदर्शन आणि दबदबा यूएई आणि दक्षिण आफ्रिकेतही कायम ठेवण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. लॉन्च केलेल्या 2 नवीन संघांची नाव मुंबई अमीरात आणि मुंबई केपटाऊन अशी आहेत.
“दोन्ही नवीन संघ समानतेने पुढे जातील. MI चा जागतिक क्रिकेट मधील वारसा अधिक उंचावतील” असा विश्वास रिलायन्स इंडस्ट्रीजच्या डायरेक्टर नीता अंबानी यांनी व्यक्त केला. यूएई आणि दक्षिण आफ्रिकेतील टी 20 लीगची सुरुवात पुढच्यावर्षी जानेवारी महिन्यापासून होऊ शकते. दक्षिण आफ्रिका लीग मध्ये 30 मार्की इंटरनॅशनल खेळाडू सहभागी होऊ शकतात. हा आकडा वाढू सुद्धा शकतो, असं लीगच्या आयोजकांनी म्हटलं आहे. या लीगसाठी पुढच्या काही आठवड्यात खेळाडूंचा लिलाव होऊ शकतो.
?? represent! Now in ???
Newest member in our #OneFamily of teams ➡️ @MICapeTown ??
?: Alex Chipi#MIcapetown @OfficialCSA pic.twitter.com/3CMOMzdyKH
— Mumbai Indians (@mipaltan) August 10, 2022
मुंबई इंडियन्ससह आयपीएलच्या 6 फ्रेंचायजींनी दक्षिण आफ्रिका टी 20 लीग मध्ये संघ विकत घेतले आहेत. मुंबई शिवाय चेन्नई सुपर किंग्स, लखनौ सुपर जायंट्स, सनरायजर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि दिल्लीचे सहमालक जेएसडब्ल्यूने संघ विकत घेतले आहेत.