मुंबई : यूएईमध्ये सुरु असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2021) मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) अजूनही मैदानात उतरला नाही. आयपीएलच्या दुसऱ्या हंगामात मुंबई इंडियन्सने आतापर्यंत दोन सामने खेळले. मात्र तरीही हार्दिक पंड्याला मुंबईने प्लेईंग 11 मध्ये स्थान दिलं नाही. त्यामुळे हार्दिक पंड्या पुढील महिन्यात होणाऱ्या टी 20 विश्वचषकासाठी पूर्णपणे फिट आहे की नाही असे प्रश्न उपस्थित होत आहेत. हार्दिक पंड्याच्या फिटनेसबाबत आधीच शंका होती. आता मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉन्डने गुरुवारच्या मॅचनंतर हार्दिकच्या फिटनेसबाबत महत्त्वाची माहिती दिली.
आयपीएलमध्ये कालच्या सामन्यात कोलकाताने मुंबईचा पराभव केला. या सामन्यानंतर पत्रकार परिषद झाली. त्यावेळी शेन बॉन्ड म्हणाला, “हार्दिक पंड्याची ट्रेनिंग चांगली सुरु आहे. मुंबई इंडियन्ससाठी आवश्यक त्या गोष्टींकडे आम्ही लक्ष देत आहोत. ऑलराऊंडर हार्दिक पंड्या पूर्ण फिट होऊन मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे. मात्र भारतीय टीमची गरज लक्षात घेऊन, मुंबई इंडियन्स त्याला मैदानात उतरवण्यासाठी कोणताही घाई करत नाही”
हार्दिक पंड्यावर मागील महिन्यात पाठीची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर पूर्णपणे बरा होऊन तो मैदानात उतरला. आता आयपीएलच्या चालू हंगामात तो मैदानात दिसेल अशी आशा होती. पण सलग दोन सामन्यात तो बाहेरच बसल्याचं पाहायला मिळालं. मात्र हार्दिक पंड्याचा सराव योग्यपद्धतीने सुरु आहे, पुढच्या मॅचमध्ये तो खूळ शकतो, असं शेन बाँडने सांगितलं.
मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात गुरुवारी सामना झाला. यावेळी केकेआरने मुंबईचा 7 विकेट्स राखून पराभव केला. त्याआधी पहिल्या सामन्यात चेन्नईने मुंबईचा 20 धावांनी पराभव केला होता.
भारत (India): विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, आर अश्विन | राखीव: श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि शार्दुल ठाकूर
क्रिकेट जगतातील सर्वात मनोरंजनात्मक स्पर्धा असणारा टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान यूएईमध्ये होणार आहे. आता स्पर्धेला काही काळच शिल्लक राहिल्याने जगभरातील देश संघ बांधणीमध्ये व्यस्त आहेत. जवळपास सर्वच देशांनी आपले अंतिम खेळाडू जाहीर केले आहेत.
भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-
संबंधित बातम्या