मुंबई: मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्समधील (MI vs CSK) आजची लढत खूपच रंगतदार ठरली. या सामन्याने शेवटच्या चेंडूपर्यंत प्रेक्षकांना श्वास रोखून धरायला लावला. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात सात बाद 155 धावा केल्या. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्सने 20 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. चेन्नईच्या विजयाचा हिरो ठरला एमएस धोनी. (MS Dhoni) मुंबई इंडियन्स (MS Dhoni) यंदाच्या आयपीएल सीजनमधला हा सलग सातवा पराभव आहे. मुंबईसाठी आजचा सामना ‘करो या मरो’ होता. कारण आजच्या विजयावरच त्यांच्या प्लेऑफच्या आशा टिकून होत्या. पण आता प्लेऑफमध्ये दाखल होण्याच्या त्यांच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. मुंबई इंडियन्स प्रमाणे चेन्नई सुपर किंग्सचा संघही या सीजनमध्ये फॉर्मसाठी संघर्ष करतोय. त्यांचा सात सामन्यातील हा दुसरा विजय आहे. त्यांचे प्लेऑफमधील आव्हान अद्यापही टिकून आहे.
अशी आहे मुंबई इंडियन्सची Playing – 11
रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, शौकीन, डॅनियल सॅम्स, जयदेव उनाडकट, रिले मेरेडि, जसप्रीत बुमराह,
अशी आहे CSK ची Playing – 11
रवींद्र जाडेजा (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथाप्पा, अंबाती रायुडू, शिवम दुबे, एमएस धोनी, ड्वेयन ब्राव्हो, मिचेल सँटनर, ड्वेयन प्रिटोरियस, माहीश तीक्ष्णा, मुकेश चौधरी,
जयदेव उनाडकटच्या सहाव्या चेंडूवर धोनीने चौकार मारुन विजय मिळवून दिला.
जयदेव उनाडकटच्या पाचव्या चेंडूवर धोनीने दोन धावा वसूल केल्या.
जयदेव उनाडकटच्या चौथ्या चेंडूवर एमएस धोनीने चौकार मारला. 2 चेंडूत 6 धावांची गरज.
जयदेव उनाडकटच्या तिसऱ्या चेंडूवर एमएस धोनीने मारला सिक्स. 3 चेंडूत 10 धावांची गरज.
जयदेव उनाडकट शेवटची ओव्हर टाकतोय. पहिल्या चेंडूवर ड्वेयन प्रिटोरियसला पायचीत पकडलं. 14 चेंडूत त्याने 22 धावा केल्या.
चेन्नईचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. अंबाती रायुडूला डॅनियल सॅम्सने पोलार्डकरवी झेलबाद केलं. रायुडूने 40 धावा केल्या. आता धोनी फलंदाजीसाठी मैदानात आला आहे. 15 षटकात चेन्नईच्या तीन बाद 105 धावा झाल्या आहेत. डॅनियल सॅम्सने आज चार षटकात 30 धावा देत चार विकेट घेतल्या.
मुंबई इंडियन्सने चेन्नईला तिसरा धक्का दिला आहे. रॉबिन उथाप्पाला 30 धावांवर जयदेव उनाडकटने ब्रेविसकरवी झेलबाद केले. दहा षटकात चेन्नईच्या तीन बाद 66 धावा झाल्या आहेत.
डॅनियल सॅम्सचा डबल स्ट्राइक. मुंबई इंडियन्सला दुसरं यश मिळालं आहे. मिचेल सँटनरने 11 धावांवर उनाडकटकडे झेल दिला. चेन्नईची 16/2 अशी स्थिती आहे.
मुंबई इंडियन्सने चांगली सुरुवात केली आहे. पहिल्याच चेंडूवर ऋतुराज गायकवाडला डॅनियल सॅम्सने आऊट केलं. तिलक वर्माकरवी झेलबाद केलं. दोन षटकात CSK च्या एक बाद 15 धावा झाल्या आहेत. सँटनर-उथाप्पाची जोडी मैदानात आहे.
15 ओव्हर्समध्ये मुंबईच्या पाच बाद 100 धावा झाल्या आहेत. पोलार्ड आणि तिलक वर्माची जोडी मैदानात आहे.
रितिक शौकीनच्या रुपाने मुंबईचा पाचवा विकेट गेला आहे. ब्राव्होच्या गोलंदाजीवर त्याने उथाप्पाकडे झेल दिला. शौकीनने 25 धावा केल्या. 13.3 षटकात मुंबईच्या पाच बाद 85 धावा झाल्या आहेत.
13 ओव्हर्समध्ये मुंबईच्या चार बाद 84 धावा झाल्या आहेत. रवींद्र जाडेजाने हे षटक टाकलं. तिलक वर्मा आणि शौकीनची जोडी मैदानात आहे. त्यांनी डाव सावरला आहे.
मुंबई इंडियन्सला चौथा धक्का बसला आहे. चांगली फलंदाजी करणार सूर्यकुमार यादव 32 धावांवर आऊट झाला. सँटनरच्या गोलंदाजीवर त्याने मुकेश चौधरीकडे सोपा झेल दिला. मुंबईच्या आठ षटकात चार बाद 49 धावा झाल्या आहेत.
तीन ओव्हर्समध्ये मुंबई इंडियन्सच्या तीन बाद 25 धावा झाल्या आहेत. षटकातील शेवटच्या चेंडूवर डेवाल्ड ब्रेविसने मुकेश चौधरीच्या गोलंदाजीवर धोनीकडे सोपा झेल दिला. त्याने 4 धावा केल्या. सूर्यकुमार चांगली फलंदाजी करतोय. तो 18 धावांवर खेळतोय.
मुकेश चौधरीची जबरदस्त गोलंदाजी. रोहित पाठोपाठ दुसरा सलामीवीर इशान किशन परतला तंबूत. मुकेश चौधरीच्या यॉर्करवर क्लीन बोल्ड. एक ओव्हर मध्ये मुंबईची स्थिती 6/2 आहे.
मुंबई इंडियन्सला पहिला झटका बसला आहे. रोहित शर्मा भोपळाही न फोडता तंबूत परतला आहे. मुकेश चौधरीच्या गोलंदाजीवर मिचेल सँटनरकडे सोपा झेल दिला.
मुंबईच्या डावाला सुरुवात झाली आहे. रोहित शर्मा आणि इशान किशनची जोडी मैदानात आली आहे. मुकेश चौधरी पहिलं षटक टाकतोय.
मुंबई इंडियन्सने आजच्या सामन्यासाठी संघात एक बदल केलाय. हृतिक शौकीन मुंबई इंडियन्सकडून डेब्यू करतोय.
Hrithik Shokeen is all set to make his debut in Blue & Gold ?
Paltan, send your best wishes for the youngster ??#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians #MIvCSK @Hrithik14S pic.twitter.com/5CUNNqBenY
— Mumbai Indians (@mipaltan) April 21, 2022
रवींद्र जाडेजा (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथाप्पा, अंबाती रायुडू, शिवम दुबे, एमएस धोनी, ड्वेयन ब्राव्हो, मिचेल सँटनर, ड्वेयन प्रिटोरियस, माहीश तीक्ष्णा, मुकेश चौधरी,
रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, शौकीन, डॅनियल सॅम्स, जयदेव उनाडकट, रिले मेरेडि, जसप्रीत बुमराह,
?️ Team News for #MIvCSK:
Ishan (WK), Rohit (C), Dewald, Surya, Tilak, Pollard, Shokeen, Sams, Unadkat, Meredith, Bumrah
Thoughts on the XI, Paltan ?#OneFamily #दिलखोलके #MumbaiIndians #TATAIPL
— Mumbai Indians (@mipaltan) April 21, 2022